News34 chandrapur
चंद्रपूर - 26 मार्च शनिवारी शहरातील नागरिकांची संजीवनी ठरलेल्या (Maulana Anil Kalam Azad) अबुल कलाम आझाद गार्डन च्या लोकार्पण कार्यक्रमात राजकीय शिष्टाचाराचा भंग चंद्रपूर मनपाने केल्याने त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. Violation of courtesyकांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी पालिका प्रशासनाला जनप्रतिनिधींचे नाव टाका अन्यथा लोकार्पण होऊ देणार नाही असा इशारा दिला होता.
मात्र चंद्रपूर शहराचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पालिका पदाधिकाऱ्यांच्या राजकारणासमोर "मै झुकेगा नही" ची भूमिका घेतली होती.
यावर त्यांनी चंद्रपूर शहरात "होय मी येणारचं आहे" असे बॅनर झळकवले. Chandrapur municipal corporation chandrapur
सर्वसामान्य जनतेची संजीवनी आझाद बगीचा मध्ये मागील 6 वर्षांपासून दुरुस्तीचे काम सुरू होते, मात्र आता पूर्णतः दुरुस्त झाल्यावर पालिका पदाधिकाऱ्यांनी लोकार्पण कार्यक्रमात राजकारण सुरू केले. Azad garden chandrapur
लोकार्पण कार्यक्रमात उदघाटक म्हणून माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, अध्यक्ष म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार, विशेष उपस्थिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार बाळू धानोरकर, महापौर राखी कंचर्लावार, प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेचे आमदार रामदास आंबटकर, आमदार नागो गाणार, आमदार अभिजित वंजारी, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गूल्हाने उपस्थित राहणार आहे.
मात्र याबाबत स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरळ सांगितले की अजूनही माझ्याजवळ आझाद बगीचा लोकार्पण कार्यक्रमाची पत्रिका पोहचली नाही.
जनप्रतिनिधींचे ऐनवेळी नाव टाकण्यात आले असून सर्वाना सध्या व्हाट्सअप्प द्वारे पत्रिका पाठविण्यात आल्या अशी माहिती पुढे आली आहे.
याबाबत आयुक्त मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता ते सध्या Not Reachable आहे.
ऐनवेळी लोकार्पण कार्यक्रमात जनप्रतिनिधींचे नाव टाकल्यावर चंद्रपूर मनपाने कार्यक्रमात होणारी राजकीय दंगल टाळली.

