चंद्रपूर - शहराच्या मध्यभागी असलेले मौलाना अबुल कलाम आझाद बगीच्याचा लोकार्पण सोहळा शनिवार 26 मार्चला आयोजित करण्यात आलेला आहे.
मात्र चंद्रपूर मनपा पदाधिकाऱ्यांनी राजकीय खेळी खेळत लोकार्पण सोहळा निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना डच्चू दिला.
पालिकेच्या या प्रकाराने लोकार्पण सोहळ्यात राजकीय दंगल नक्कीच बघायला मिळणार आहे.
राज शिष्टाचाराचे पालन करा अन्यथा लोकार्पण होऊ देणार नाही असा इशारा कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी दिला आहे. Congress warnes
पालिकेच्या राजकीय खेळीला स्थानिक आमदाराने जोरदार प्रत्युत्तर देत "होय मी येणारचं आहे" असे फलक शहरात झळकवले. Azad garden chandrapur
वर्ष 2016 आझाद बगीच्याचे दुरुस्तीकरण करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले मात्र कासवगतीने करण्यात आलेल्या या दुरुस्तीकरणाला 6 वर्षाचा कालावधी लागला, या काळात पालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले होते.
शहरातील नागरिकांना स्वच्छ हवा, ऑक्सिजन मिळावे यासाठी बगीच्याचे दुरुस्तीकरण गरजेचे होते मात्र काम पूर्ण झाल्यावर स्थानिक जनप्रतिनिधींना निमंत्रित न करणे ही पालिकेची राजकीय सुडबुद्धीचा प्रकार आहे.
या आधी पालिकेच्या महापौर चषक कार्यक्रमात भाजपच्या मंत्र्यांनाचं डावलण्यात आले होते, त्यानंतर बाबूपेठ येथील पोलीस चौकी लोकार्पण कार्यक्रमात ही पालिकेने हाच प्रकार केला. Politics
नागरिकांच्या मूलभूत समस्या पूर्ण करण्यावर पालिकेने कधी भर दिला नाही, नेहमी वादग्रस्त निर्णय घेण्यात चंद्रपूर मनपा अव्वल राहली.
शहरातील संपूर्ण रस्ते अमृत योजनेच्या नावाखाली खड्ड्यात टाकण्यात आले, रस्त्यावर डांबरीकरण व काँक्रीटीकरण हे दोन्ही दृश्ये जगात फक्त चंद्रपुरातचं दिसतात.
याआधी आमदार जोरगेवार यांनी महापौर यांच्याविरोधात दे धक्का आंदोलन केले होते, कोरोना काळात चारचाकी वाहनांच्या vip क्रमांकासाठी 70 हजार रुपये खर्च करण्यात आले होते, त्या आंदोलनाचा राग तर पालिका पदाधिकाऱ्यांना तर नाही ना अशी चर्चा जनमानसात रंगली आहे. Mla kishor jorgewar
निमंत्रित पत्रिकेवर नाव नसताना आमदार जोरगेवार यांनी सामान्य नागरिकांच्या आझाद बगीच्याच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहणारचं अशी भूमिका घेतली आहे, आपण नागरिकांचे जनप्रतिनिधीं आहो माझं आयुष्य त्यांच्यासाठीचं आहे, कोणतेही राजकारण न करता चांगल्या कामासाठी मी सदैव तत्पर राहणार अशी भूमिका आमदार जोरगेवार यांनी घेत चंद्रपूर शहरात "होय मी येणारचं आहे" असे फलक झळकवले आहे, या फलकाची शहरात जोरदार चर्चा रंगली असून दाक्षिणात्य चित्रपट पुष्पा मधील नायकाचा "मै झुकेगा नही साला" या प्रसिद्ध डायलॉग प्रमाणे जोरगेवारांनी या माध्यमातून आपली भूमिकाचं घेतली आहे.