चंद्रपूर, दि.18 मार्च : जिल्हयात शुक्रवारी (दि.18) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही.जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. get covid info तर जिल्ह्यात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
indian variant
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 955 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 385 झाली आहे. सध्या 3 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 89 हजार 959 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 89 हजार 625 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे. new variant
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, (follow - google news) असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. latest update chandrapur