News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर साईशांती नगर येथील हनुमान मंदिर परिसरात 8 मार्च "जागतिक महिला दिन" चे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. woman day अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सुरेखा झाडे, पिंगलाबाई डाहिके,प्रभावती मालेकार इतरांची उपस्थिती होती. यावेळी वृद्ध महिलांचा सत्कार करण्यात आला.
साईशांती नगरातील यशोधा धनबहादूर बिस्ट या गरीब मुलीला शैक्षणिक खर्चासाठी उपस्थित महिलांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. विवीध स्पर्धा घेण्यात आल्या. जागतिक महिला दिन का साजरा केला जातो,याचे महत्व काय, याविषयीची माहिती सौ.सुरेखा झाडे यांनी आपल्या भाषणाद्वारे उपस्थित महिलांना दिली.तर "चूल आणि मुल" ऐवढेच न बघता आज महिलांनी आपले कौशल्य व कर्तुत्ववाच्या जोरावर सर्व क्षेत्रात भरारी घेत आहे. त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न महिलांनी करावा असे मत सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.कार्यक्रमात मोठ्यासंख्येने महिलांची उपस्थिती होती.संचालन सौ.इंदिरा पाचभाई, प्रास्ताविक सौ.मधूरी रासेकर तर आभार सौ.शालीनी उरकुडे यांनी व्यक्त केले.