News34
गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या नफ्यामधून केवळ शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी शेतकरी व त्यांचे कुटुंबीय यांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना हिम्मत देणे हेच cdcc bank चे कर्तव्य आहे. असे मत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मुल येथील कॅन्सरग्रस्त शेतकरी राकेश गंगाधर भुपतवार यांना देतांना व्यक्त केले. chandrapur newsयासाठीच शेतकरी कल्याण निधीची तरतूद करण्यात आली असून जमा झालेल्या शेतकरी कल्याण निधीचा उपयोग शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव वाचविण्यासाठी CDCC Bank Chandrapur मदत करीत आहे. मुल येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण श्री. राकेश भुपतवार यांच्या उपचारासाठी लाखो रुपयांची गरज असल्याबाबतची माहिती कांग्रेस नेते व CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना माहीत होताच तात्काळ बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून पंचवीस हजार (२५,०००) रुपये तात्काळ मंजूर करून मदतिचा चेक कांग्रेसचे नेते तथा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णास अनेक नागरिकांच्या उपस्थिती चेक दिला. याप्रसंगी मुल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, ग्राम पंचायत तालुका संघटनेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अखिल गागरेड्डीवार ,मुल बँकेचे शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरें, संजय पडोळे, गुरु गुरनुले, साईनाथ भूपतवार, उपस्थित होते. शेतकरी रुग्णाला मदतीची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी बँकेचे सूत्रं हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक बदल केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी एकमेव बँक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या बँकेला मिळालेल्या आर्थिक नफ्यातून धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कँसर सारखे दुर्धर आजार झाल्याने शेतकरी खचतो म्हणून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत देऊन रुग्णाला व त्यांच्या कुटुंबीयांना पुनर्जीवित करण्याचे कार्य करीत असल्याने शेतकरी व कुटुंबियांनी संतोषसिंह रावत व बँकेचे आणि समस्त संचालक मंडळांचे रुग्णांच्या कुटुंबीयांनी आभार मानले आहे. Cancer-stricken farmers
