चंद्रपूर - राजकीय नेते, अवैध धंदे व हफ्तेखोरी हे भयाण वास्तव सध्या चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळत आहे. राजकीय पुढारी कार्यक्रम घेण्यासाठी अवैध धंदे व्यावसायिकांकडून पैसे मागतात तर काही राजकीय पुढारी स्वतः अवैध धंदे करण्यात लिप्त आहे. sand mafia
कोल माफिया, वाळू माफिया व सुगंधित तंबाखू तस्कर यामध्ये जिल्ह्यातील काही नामांकित राजकारणी यांचा भरभरून सहभाग आहे. chandrapur
कारवाई न होण्याचे कारण म्हणजे राजकीय, आतातर हद्दच झाली आहे, कारण अवैध धंदे व्यावसायिक व माफिया स्वतः पत्रकारिता क्षेत्रात आली. Aromatic tobacco
चंद्रपुरात वाळू तस्करांच्या गळ्यात पत्रकारितेचे ओळख पत्र लटकविल्याचे चित्र सहजपणे बघायला मिळतात, काही कंत्राटदार यांच्या गळ्यात कामे घेण्यासाठी ओळ्खपत्राचा उपयोग करतात.
सुगंधित तंबाखूचा व्यापार करण्यासाठी तस्कर करणारे स्वतः राजकीय पद भूषवित आहे.
असे अनेक चित्र-विचित्र गुन्हेगारी करणारे पत्रकारिता क्षेत्रात शिरल्याने प्रामाणिक पत्रकारांना आपले काम करण्याची संधी उपलब्ध होत नाही. chandrapur jilla
खंडणीखोरी करणारे पुन्हा खंडणी मागण्यासाठी सज्ज होऊन बसले, तर काही राजकीय पद मिळाल्यावर गळ्यात पत्रकारितेचे ओळखपत्र लटकवीत वसुली करीत आहे. coal mafia
कलम 307, 354, 384 व नागरिकांची नाहक बदनामी करणारे गुन्हेगारी सहित पत्रकारितेत वावरत आहे.
अश्या टवाळक्या गुन्हेगारांमुळे पत्रकारिता क्षेत्राचे नाव बदनाम झाले आहे. corruption chandrapur
जिल्हा व पोलीस प्रशासनाने अश्या टवाळखोरी करणाऱ्या गुन्हेगारी वृत्ती असलेल्या पत्रकारांवर नियंत्रण करावे अन्यथा पुढे या वृत्तीचा उद्रेक होऊ शकतो. new id card
