News 34 (गडचांदूर/सै.मुमताज अली)
चंद्रपूर :- "जागतिक महिला दिना" च्या निमित्ताने सर्वत्र महिला दिन साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून महिला मेळावे घेण्याची विविध राजकीय पक्षाच्या मंडळीत जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या रणरागीणींचा सत्कार होणे ही बाब कौतुकास्पद असून मात्र यासाठी वरिष्ठांचे फर्मान म्हणून एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षांनी रेती माफिया,क्षेत्राचे तहसिलदार,ठाणेदार यांच्याकडून चक्क वसूली केली ! हे कितपत योग्य असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.
Chandrapur marathi news
Chandrapur marathi news
चंद्रपूर जिल्ह्यात हल्ली विविध प्रकारच्या अवैध धंद्यांना अनपेक्षितपणे उधाण आल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जिल्ह्यातील या अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याचे आदेश दिले.आणि आता राष्ट्रीय पक्षाच्या एका महिला तालुकाध्यक्षांनी महिला मेळावा कार्यक्रमासाठी रेती माफियांना फोनवरून दहा हजाराची मागणी केल्याचे समोर आले आहे.या संभाषणाची आडियो क्लिप वायरल झाली असून अवैध धंद्याविषयी पालक मंत्र्यांनी दिलेले आदेश निव्वळ दिखावा तर नाही ना ? अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. Viral Audio clip news
सदर ऑडिओ क्लिप ही whatsapp ग्रुपच्या माध्यमातून चांगलीच व्हायरल होत आहे, एकीकडे अवैध धंद्यांना बंद करण्याचे आदेश द्यायचे व दुसरीकडे कार्यक्रम घेण्यासाठी अवैध धंदे व्यावसायिकां जवळून वसुली, यावरून सिद्धच होते की राजकीय पाठबळशिवाय अवैध धंदे सुरू होऊच शकत नाही. Sand mafiya
संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सध्या हेच वातावरण आहे, कोळसा, वाळू व सुगंधित तंबाखू चे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आणि यामध्ये राजकीय पदाधिकारी सुद्धा आपले हात रंगवीत आहे.
सदर वसुली ही आमदाराच्या आदेशाने होत असल्याची कबुली या संभाषणात आहे. National Party
राजकीय पक्ष पदाधिकारी यांचं म्हणणे सरळ असते पक्ष चालविण्यासाठी पैसे लागतात आणणार कुठून?
सदरच्या व्हायरल ऑडिओ क्लिप ची सत्यता जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वाने तपासायला हवी, सध्या समाजमाध्यमात ती क्लिप व्हायरल झाली आहे, सदर बातमी त्या व्हायरल क्लिप च्या आधारे बनविण्यात आली आहे.
