News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
औद्योगिक शहराच्या नावाने प्रसिद्ध कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर येथे अनेक कामगार पाहायला मिळतात.या शहरातील वाढत्या इमारतींमुळे अनेक इमारत बांधकाम कामगारांच्या संख्येत वाढ होत आहे.
यांची सुरक्षा व दक्षता काय ? (Security and efficiency) याबद्दल महाराष्ट्र कामगर कल्याण मंडळ गट कार्यालय चंद्रपूर,कामगार कल्याण केंद्र बल्लारपूर अंतर्गत गडचांदूर येथे मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज ईळवे,नंदलाल राठोड विभागीय कार्यालय नागपूर तसेच रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय चंद्रपूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 15 मार्च रोजी महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम नोंदणीकृत कामगारांसाठी सुरक्षा,दक्षता व जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजप गडचांदूर शहराध्यक्ष व सतीश उपलेंचीवार होते तर प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर,गडचांदूर राजमिस्त्री फाऊंडेशन अध्यक्ष चंद्रकांत सोमवंशी, इमारत बांधकाम कामगार संघ विदर्भ प्रदेश सचिव अरविंद कोरे,जिल्हा सचिव सुनील गोंडे इतरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामेश्वर अळणे,संचालन सुरेश इटनकर तर आभार सौ.सविता वरखेडकर यांनी व्यक्त केले. Construction registered workers