News34
मूल (गुरू गुरनुले)
उधारीचे लाखो रूपये वसुली करून दुचाकीने परत येत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीला धडक मारून खाली पाडून शस्ञाचा धाक दाखवुन लंपास केल्याची घटना काल मूल जवळ घडली. दरम्यान पोलीस प्रशासन अज्ञात दुचाकीस्वारांचा शोध घेत आहे. Fear of arms
स्थानिक गोयल बंधुच्या मालकीच्या महालक्ष्मी cement आणि hardware कंपनी व्दारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात लाखोचा व्यवसाय केल्या जातो. व्यवसायाव्दारे साहीत्य विक्री केल्यानंतर तीन नौकराकरवी संबंधीतांकडून वसुली करणे हा नित्याचा कार्यक्रम. ठरल्यप्रमाणे घटनेच्या दिवाशी (बुधवार) मूल येथील अक्षय गोवर्धन आणि हळदी येथील दिनेश चलाख हे हिरो स्पेल्डर (एमएच-३४- बीवाय ७२२१) ने उधारी वसुली करीता पोंभुर्णा, गडचांदुर, राजुरा, बल्लारशा, चंद्रपूर, चिचपल्लीला गेले होते. वसुली करून वसुल झालेले १८,९३,५२० रूपये घेवुन अंदाजे ८.४५ ते ९ वा. चे दरम्यान मूल कडे परत येत असताना जानाळा-मूल मार्गावरील डोणी फाट्यालगतच्या वळणमार्गावर पाठीमागेहुन आलेल्या मोपेड दुचाकीस्वाराने धडक मारली. मोपेडची धडक लागताच चलाख आणि गोवर्धन दोघेही खाली पडले. चलाख आणि गोवर्धन खाली पडताच मोपेड स्वारापैकी एकाने गोवर्धन ह्याला मारहाण करून शस्ञाचा धाक दाखवुन त्याचेजवळ असलेली रूपयाची बँग हिसकावुन चंद्रपूर मार्गे पसार झाले. Robbery
घनदाट जंगल असलेल्या घटनास्थळावरून मोबाईल न लागल्याने अक्षय गोवर्धन ह्याने पाठी मागेहुन येत असलेल्या वाहणाला Lift मागुन मूल गाठले आणि घडलेला घटनाक्रम दुकानमालक दिनेश गोयल यांना सांगीतला. वसुली करून येणाऱ्या नोकराकडून घटनेची माहीती होताच गोयल ह्यांनी घटनेची माहीती मूल पोलीसांना दिली, रहदारीच्या मार्गावर लाखो रूपयाची वाटमारी झाल्याचे समजताच त्याच मार्गावर गस्तीवर असलेले ठाणेदार सतिशसिंह राजपुत लागलीच घटनास्थळी पोहोचले. Dense dark forest
घटनेची माहीती वरीष्ठांशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला देवुन राञौपासुनच नाकेबंदी करण्यात आली. दरम्यान पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अतिरीक्त पोलीस अधिक्षक कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे आदींनी घटनास्थळी भेट देवुन माहीती जाणुन घेवुन त्यादृष्टीने तपासचक्र सुरू केले आहे. पुढील तपास पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बाबा खाडे आणि मूल पोलीस स्टेशनचे पोउनि पुरूषोत्तम राठोड करीत आहेत.