चंद्रपूर - चोराळा येथील क्षितिज लेआऊट मध्ये तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने शहरात चांगलीच खळबळ माजली.
20 वर्षीय तरुणीला 22 वर्षीय अभिषेक देशभ्रतार नामक तरुणाने भेटण्यासाठी बोलाविले होते मात्र काही वेळात अभिषेकने तरुणीच्या मैत्रिणीला तिच्या मृत्यूची माहिती दिली.The mystery of the young woman's death
सदर मृत्यू हा चारचाकी बोलेरो वाहनाने झाला असल्याचे अभिषेकने सांगितले होते, मात्र अनेकांना घातपाताचा संशय व घटनास्थळी Offensive objects आढळल्याने अनेकांना घातपात झाला असल्याचा संशय बळावला. Crime news
मात्र मुलीच्या प्रकरणात तात्काळ पंचनामा व शवविच्छेदन सुद्धा पोलिसांतर्फे उशिरा करण्यात आले, पोलिसांनी निष्पक्ष कारवाई करावी अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली.
त्या तरुणीचा मृत्यू अधिक रक्तस्त्रावाने झाला असल्याची माहिती आहे. Chandrapur police
पडोली पोलिसांनी या प्रकरणी 4 संशयितांना चौकशी साठी ताब्यात घेतले असून बोलेरो या चारचाकी वाहनाचा वाहनचालक स्वतः पडोली पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असल्याची माहिती मिळाली आहे.Exciting incident in Chandrapur
सदर तरुणीचा मृत्यूचे नेमके कारण काय? हत्या, अपघात की अत्याचार याबाबत पुढील आठवड्यात समजेल.