News 34 chandrapur
चंद्रपूर - 18 फेब्रुवारीला दुर्गापुरातील 16 वर्षीय राज भडके या मुलाला बिबट्याने उचलून नेत त्याला ठार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा दुर्गापुरातील नेरी येथे 8 वर्षीय प्रतीक बावणे या मुलाला घरासमोरून बिबट्याने उचलून नेत ठार केले. Leopard attack
सदर घटना रात्री 8 वाजेदरम्यान घडली असून त्यावेळी प्रतीक हा घरा समोर खेळत होता, बिबट्याने अचानक प्रतीक वर हल्ला करीत त्याला उचलून नेले, अचानक झालेल्या या हल्ल्यात नागरिकांनी प्रतीक ची शोधाशोध केली मात्र घरापासून 100 मीटर अंतरावर वेकोलीच्या नर्सरी जवळ प्रतिक चे क्षत विक्षित मृतदेह मिळाल्याने नागरिक वनविभागावर चांगलेच संतापले.
सदर परिसरातील वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आंदोलन केले होते मात्र पुन्हा घडलेल्या या प्रकाराने भटारकर ही चांगलेचं संतापले आहे. Man eater leopard
दुःखद बाब म्हणजे प्रतीक हा भद्रावती येथे राहणारा होता, प्रतिकच्या आईच्या वडिलांचे (आजोबा) निधन झाल्याने प्रतीक आई-वडिलांसोबत दुर्गापूर ला आला मात्र इथं येणं त्याच्या जीवावर बेतणार हे त्यालाही कदाचित माहीत नसेल. Wild animal attack
नागरिकांचा उद्रेक बघता दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी मोर्चा सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे.
आज नागरिकांचे जीवन स्वस्त झाले असून वन्यप्राण्यांचे जीव हे महाग आहे, सतत दुसरा हल्ला केल्यावरही वनविभाग त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करू शकले नाही. Durgapur 8 year boy killed leopard attack
त्या बिबट्याला वनविभागाने ठार करावे अशी मागणी नितीन भटारकर यांनी केली आहे, जर परवानगी मिळत नसेल तर आम्ही गावकरी मिळून त्या बिबट्याला ठार करू अशी प्रतिक्रिया भटारकर यांनी दिली आहे.