चंद्रपूर - विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात एनएसयुआय चे राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू यांच्या नेतृत्वात भव्य गांधी संदेश यात्रा काढत चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
SC, ST, OBC व इतर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ वितरित करण्यात यावी, भ्रष्टाचाराची नर्सरी बनलेल्या गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये नागपूर विद्यापीठाशी संलग्न करण्यात यावे.Gandhi Sandesh Yatra
महिला विद्यार्थ्यांसंदर्भात त्यांच्या सुरक्षितेवर विशेष लक्ष देत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोफत बस सेवेचा प्रारंभ करण्यात यावा. NSUI
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला बार्टी DBatu टेक्निकल विद्यापीठाला संलग्नित करावे अश्या विविध मागण्यांसाठी गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गांधी संदेश यात्रा काढण्यात आली. Student
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोशन लाल यांनी कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्याने शैक्षनिक सत्रात समस्या उभ्या झाल्या आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी देशातील विद्यार्थ्यांचे संघटन NSUI अग्रेसर असून शैक्षणिक क्षेत्रात काही अडचणी निर्माण झाल्यास आम्ही सदैव आपल्यासोबत उभे राहू अशी ग्वाही दिली.
कांग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या प्रेरणेने आज NSUI कॅम्पस सारख्या विचारसरणीचा वारसा चालवीत आहे, यासाठी अनेक ठिकाणी विभिन्न कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यास NSUI अग्रेसर आहे. Rahul gandhi
छात्र पंचायती नंतर गांधी संदेश यात्रेचे आयोजन करीत ग्रामीण ते शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीला तोंड देण्यास NSUI सज्ज असणार.
या रॅलीत विधानसभा अध्यक्ष शफाक शेख, स्वाती देशमुख, याकुब पठाण, विक्की बिस्वास, प्रतीक नल्लाल, कुणाल पाटील, प्रीती यादव, आदी पदाधिकारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.