News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे 30 मार्च रोजी येथील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे पहिल्यांदाच मुस्लिम जमातच्या वतीने "मुस्लिम समाजाचा वधू,वर परिचय मेळावा" आयोजित करण्यात आला. यामध्ये एकूण 25 मुलामुलींनी परिचय दिला. Willing to marry
चंद्रपूर,गडचिरोली,यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील मुस्लिम समाज नागरिक (Muslim society citizens) व विवाह इच्छुक मुलामुलींची उपस्थिती होती. अशा प्रकारच्या परिचय मेळाव्यामुळे विवाह करणाऱ्यांना जोडीदार निवडण्यास मदत होईल, प्रत्येक ठिकाणी असे मेळावे आयोजित करण्याची गरज असून यामुळे खर्च आणि वेळेची बचत होईल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरपना पंचायत समितीचे माजी उपसभापती राऊफ खान होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सैय्यद आबीद अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव रफिक निजामी,अब्बास भाई इतरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. मेळाव्याला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवली.