News34Sindewahi
(प्रशांत.गेडाम)
सिंदेवाही - दिनांक 7/3/2022 सोमवार ला दुपारच्या सुमारास हेमंत चौधरी हा दारूच्या नशेत चालवीत असता पोलिसांना मिळून आला. Drunk & drive
हेमंत चौधरी वय 24 राहणार सिंदेवाही हा आपल्या स्वतःच्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच -34 CA- 0343 हिरो स्प्लेंडर ने सिंदेवाही शहरातील रस्त्यांवर नागमोडी वळण मार्ग असल्यासारखं सरळ रोड मार्गावर वाकडे - तिकडे करून चालवीत असताना सिंदेवाही पोलिसांनी पकडले. drunkenness
हेमंत चौधरी याला ताब्यात घेतले व सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केले असता हेमंत हा दारूच्या नशेत मिळुन आला. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालानुसार सिंदेवाही पोलिसांनी अप क्रमांक- 72/2022 नोंद करून आरोपी हेमंत चौधरी यावर 185 अंतर्गत Motor Vehicle Act नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई सिंदेवाही ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सावसाकडे ,संजीव गेडेकर मंगेश श्रीरामे ,अरडपहारे यांनी केली आहे.