News34 Chandrapur
चंद्रपूर : पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांना संबोधित करताना म्हणाले की, पक्षात सर्व जाती, धर्म, भाषेचे लोक सोबत घेऊन, जनाधार वाढवून, सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्ते मध्ये भागीदारी मिळवुन देण्याचा मी संकल्प केला आहे. कोणत्याही पक्षाशी युती केली तर ती पक्ष हितासाठीच करेन.
RPI Ambedkar
RPI Ambedkar
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. मोहनलाल पाटील म्हणाले की, "आमचा पक्ष देशातील 30 राज्यात कार्यरत आहे. चंद्रपुरात रिपब्लिकन पक्षाला पुन्हा बळकट करून रिपब्लिकन योद्धा स्मृतीशेष Barrister Rajabhau Khobragade यांचे स्वप्न साकार करायचे आहे. News34
विदर्भ प्रदेश महिला विंग व चंद्रपूर जिल्हाध्यक्षा सौ.प्रिया खाडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करणाऱ्या नेत्यांमध्ये महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पवार, विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर, नागपूर जिल्हाध्यक्ष विनोद थूल, गडचिरोलीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम, गोंदिया जिल्हा प्रभारी कुवरलाल रामटेके, भंडारा जिल्हाध्यक्ष सतीश बनसोड यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला हर्षल गुलघाणे, सुधा अलोने, कविता महाजन, सुषमा खाडे, मनीषा रामपूरकर, सुधा सहारे, शुभांगी दुपारे, प्रगती भोसले, तानाजी मिसले, विवेक खाडे, पंचम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास पक्षाचे महिला, पुरुष व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.