चंद्रपूर - उत्तरप्रदेश uttar pradesh, गोवा, मणिपुर व उत्तराखंड या राज्यात भाजपाचा देदीप्यमान विजय झाला असून या विजयाने आजही भाजपाकडे जनतेचा कल असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून प्रधानमंत्री मान. नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर तसेच त्यांनी देशाच्या विकासात दिलेल्या भरीव योगदानावर प्रचंड विश्वास दर्शवला. News34
Win Bjp
Win Bjp
खऱ्या अर्थाने भाजपाचा हा विजय म्हणजे राष्ट्रवादी विचारांचा, लोकाभिमुख धोरणांचा, समतोल विकासाचा विजय असून लोकशाही मुल्यांचा सुध्दा हा विजय असल्याचे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या विजयावर प्रतिक्रीया व्यक्त करतांना केले. Election result live
या चार राज्यांमध्ये मतदारांनी जातीपातीच्या पलीकडे जावून, धनलोभाला कोणताही थारा न देता भाजपाला विजयाश्री बहाल करून पुन्हा सत्तेची संधी दिली आहे. या विजयाने भाजपाला वाढता जनाधार लाभत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून या चारही राज्यात भाजपाच्या नेतृत्वात विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.