News34
चंद्रपूर : मनपा आयुक्ताच्या बंगल्याचे नाट्य मनपामध्ये गाजत आहे. मनपाच्या मालकीचा बंगला नसतानाच ४० लाख रुपये कोणत्या आधारावर खर्च केले, असा प्रश्न नगरसेवक पप्पू देशमुख यांनी स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांना आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केला.
मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता हा बंगलाच खाली करण्याचे आदेश पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने दिले आहे. मनपाने वेळीच काळजी घेतली असती तर ४० लक्ष रूपयांचा आर्थिक फटका बसला नसता. मनपाची मालकी नसताना जुन्या बंगल्याच्या केवळ दुरुस्तीवर एवढा निधी कसा खर्च केला असा प्रश्न सलग दोन Standing Committee बैठकीमध्ये विचारला. मात्र स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांनी उत्तर देण्याचे टाळले. यावरुन सभापती संदीप आवारी अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य पप्पू देशमुख यांनी केला आहे. Commissioner Homeless
महानगरपालिकेतील सत्ताधारी व अधिकारी यांच्या मनमानी कारभाराचे अनेक किस्से आजपर्यंत उघडकीस आलेले आहे. आता आयुक्तांच्या ४० लाख रुपये खर्च केलेला Bungalow जिल्हाधिकाऱ्यांनी परत मागितल्यामुळे आयुक्तांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. स्थायी समितीच्या सभेत यापूर्वी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सभापती आवारी यांचे लक्ष वेधले होते. परंतु आवारी यांनी देशमुख यांच्या प्रश्नांचे उत्तर देणे जाणीवपूर्वक टाळले. तसेच लिमरा एजन्सीकडून मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम, स्थायी समितीच्या टिपणीमध्ये जाणीवपूर्वक कंत्राटदारांच्या हितासाठी अपूरी माहिती देण्याचा विषय अशा अनेक नियमबाह्य विषयांकडे सभापती आवारी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यावरुन अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य कामाविरुद्ध सभापती आवारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून शहरातील नागरिक व मनपाची आर्थिक स्थिती याच्यापेक्षा अधिकाऱ्यांची जास्त त्यांना काळजी आहे, असा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.