News34
महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारा अर्थसंकल्प – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
‘वढा’ तीर्थक्षेत्र विकास, व्याघ्रसफारी व वन्यजीव बचाव केंद्राची अर्थसंकल्पात घोषणा
चंद्रपूर दि. 11 मार्च : महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. गत दोन वर्षे कोरोनाच्या संकटात गेली असली तरी राज्य विकासाच्या बाबतीत अग्रेसर आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हे सरकार काम करीत असून आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारा आहे.A development-oriented budget
विशेष म्हणजे ‘वढा’ तीर्थक्षेत्र, व्याघ्रसफारी आणि वन्यजीव बचाव केंद्राची निर्मिती व गडचिरोली येथे नवीन विमानतळ यासह अनेक बाबींची घोषणा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी ही नक्कीच उपलब्धी आहे, असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
Maharashtra budget 2022
वर्धा – पैनगंगा नदीच्या संगमावर वसलेले व साक्षात प्रति पंढरी असलेल्या ‘वढा’ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटी रुपये आजच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे. राज्यात वनांच्या क्षेत्रात वाढ झाली असून चंद्रपूरमध्येही वनांचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे शहरालगत 171 हेक्टरवर व्याघ्र सफारी साकारण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूरमध्ये वन्यजीव बचाव केंद्राची निर्मिती याबाबसुध्दा अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांपासून शेतमालांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सौरकुंपण लावण्यात येणार आहे. कोविड मुळे मृत्यु झालेल्या कुटुंबियांच्या नजीकच्या नातेवाईकाला 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात 503 कोटी 63 लक्ष रुपयांचा लाभ बँकेत जमा करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
Finance minister
पुढे ते म्हणाले, कृषी निर्यात धोरण ठरविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून 1 ट्रिलीयनची अर्थव्यवस्था असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. प्रत्येक जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेचा विस्तार करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. तसेच कर्जफेड करणा-या शेतक-याला अनुदान देण्यात येणार आहे. भरड धान्यावर विशेष जोर दिला जाईल.
Mahavikas aghadi government
पुणे जिल्ह्यातील संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्रासाठी 10 कोटी रुपये, गोसुखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी, विदर्भ – मराठवाडा कापूस सोयाबीन विकासासाठी एक हजार कोटी, विमुक्त, भटक्या व इतर मागस वर्गाच्या सक्षमीकरणाकरीता महाज्योतीला 250 कोटी, कौशल्य विकास योजनेंतर्गत राज्यात पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, आश्रम शाळांसाठी 400 कोटींचा निधी, थोर समाजसेवकांच्या नावाने अध्यापन केंद्र, महापुरुषांच्या जन्मगावातील शाळांना अतिरिक्त निधी, शबरी आदिवासी योजनेंतर्गत toilet आदींचा अर्थसंकल्पात समावेश आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी, सामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, मजूरवर्ग या सर्व घटकांच्या विकासासाठी आहे, असे पालकमंत्री अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना म्हणाले.
--–--------------
लोकाभिमुख सेवा देणारा अर्थसंकल्प : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला आहे. यात राज्यातील कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारा तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासाकरिता भरीव तरतुद असलेला लोकाभिमुख अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. असल्याची प्रतिकिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली आहे. government budget 2022
महिला भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एक महिला रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्याकरिता १७१ क्षेत्रामध्ये जंगल सफारी सुरू करण्यात येणार असून चंद्रपूर येथे वन्यजीव बचाव केंद्र उभारणार आहे. मी व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन कचराळा येथे सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील वढा तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता २५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्याकरीत पीक कर्जात भरीव वाढ करण्यात आली आहे. सिंचन क्षेत्रात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. युवकांना क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकरिता क्रीडा विभागाला ३८५ कोटी रुपये देण्यात आले आहे. माझी वसुंधरा या योजनेकरिता १०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाकाळात बेरोजगारी वाढल्यामुळे ३ लाख ३० हजार बेरोजगारांना नोकरी देण्याचे जाहीर केले आहे. maharashtra budget 2022 live
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील जनतेपर्यंत सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पोटतिडकीने काम करीत आहे. या कामी महाविकास आघाडी सरकारच्या सर्व शेतकरी, भूमिपुत्र, सामान्य जनतेसाठी उपयुक्त योजनांचा लाभ, लोकाभिमुख सेवा देणारा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला आहे.
maharashtra budget stamp duty
---------------
आश्वासनांपासून पळ काढणारा निराशाजनक अर्थसंकल्प ; आ. सुधीर मुनगंटीवार
असत्य कथन करणारा, मागील अर्थसंकल्पाची 'कट पेस्ट" असलेला महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाची फसवणूक करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. निधीचे नियोजन करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. केवळ आकड्यांचा खेळ करून, महाविकास आघाडीने महामानवांच्या फोटोसह जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढणारा निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे. कॉपी केल्यानंतर जशी रस्टिकेट ची शिक्षा असते, तसेच महाराष्ट्रतील जनता या सरकारला रस्टिकेट केल्याशिवाय राहणार नाही.विकासाचा कोणताही ठोस संकल्प नसलेला, अर्थहीन, दिशाहीन व राज्याला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्याची टिका माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. maharashtra budget highlights
महाविकास आघाडी सरकारचा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प फसवा असल्याची टिका आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यातील जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठया अपेक्षा असताना अर्थमंत्र्यांनी मात्र जनतेच्या तोंडला पाने पुसली आहे. विकासाबाबत प्रादेशिक समतोलाचा अभाव प्रामुख्याने दिसुन येतो. नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यांना ५० हजार रू. प्रोत्साहनपर देण्याबाबतचे आश्वासन गेल्या अर्थसंकल्पात देण्यात आले होते मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पुन्हा याच विषयाला स्पर्श करण्यात आला आहे. केवळ घोषणांचा पाऊस अर्थमंत्र्यांनी पाडला असून बेरोजगारांसाठी कोणतीही ठोस योजना देण्यात आलेली नाही.विकासाचा कोणताही ठोस संकल्प नसलेला, अर्थहीन, दिशाहीन व राज्याला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्याची टिका माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. Opposition criticizes the budget
---------------
महाराष्ट्राचा सर्व समावेशक विकास साधणारा अर्थसंकल्प - आ. किशोर जोरगेवार
क्रीडा, सांस्कृतीक, धार्मीक, शैक्षणीक, आरोग्य, पर्यावरण, पायाभुत सुविधा, शेतकरीवर्ग, गोर - गरिब, कायदा सुव्यवस्था, लघु उद्योग, कामगार, तृतीयपंथी, या सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवत मोठ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामूळे आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ख-र्या अर्थाने महाराष्ट्राचा सर्व समावेशक विकास साधणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.
maharashtra budget today latest news
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अधिवेशनात राज्याचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील वढा तिर्थ क्षेत्राच्या पर्यटनदृष्टा विकासासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच चंद्रपूर येथील वन विभागाच्या 171 हेक्टर जागेवर व्याघ्र सफारी करिता पाच वर्षात 286 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे हमखास वाघाच्या दर्शनासाठी जग प्रसिध्द असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला आणखी चालना मिळणार असून याचा मोठा फायदा रोजगार निर्मीत्तीसाठी होणार आहे. झोपडपट्टी सुधारणा धोरण राबविण्याची घोषणाही सदर अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याचाही फायदा निश्चीतपणे चंद्रपूर जिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांना होणार आहे. कोरोनामूळे घरातील कर्ता गेलेल्या महिलांना स्वयंरोजगारासाठी शुन्यदर व्याजावर कर्ज उपलब्ध करुन देण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ५ हजार गॅस स्टेशन सुरु करणार असल्यामुळे गॅस सिलेंडरचेही दर कमी होणार आहे. कौशल्य रोजगार विकासाठी ६१५ कोटी रुपये, शालेय शिक्षणासाठी २,३५३ कोटी रुपये, क्रीडा शेत्रासाठी ३८५ कोटी रुपये अश्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहे. एकंदरित विचार केला असता या अर्थसंकल्पात चंद्रपूरातील धार्मीक आणि पर्यटनासाठी मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली असून सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
----------
पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प : आमदार प्रतिभा धानोरकर
चंद्रपूर : आजच्या अर्थसंकल्पात पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा सन्मान केला. महिला आमदार म्हणून हा अर्थसंकल्प बघून महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक कवच दिले आहे. त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आहे.
maharashtra budget news
आजच्या अर्थसंकल्पात माझ्या मतदारसंघाला अजित दादांनी आम्हाला ऊर्जा रुपी भेट दिली आहे. कचराळा येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात महिला रुग्णालय देखील उभारण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपये निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. माझी वसुंधरा साठी १०० कोटी रुपये देण्यात आले. करोना मुळे बेरोजगार युवकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता राज्यात ३ लाख ३० हजार बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. गॅस चे दर देखील कमी होणार आहे. अंगणवाडी सेविका भगिनी करिता देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना मोबाईल फोन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्याकरिता वनक्षेत्रात १७१ हेक्टरमध्ये व्याघ्र सफारी सुरु करणार आहे. तसेच या भागातील वन्य प्राण्यावर तात्काळ उपचार होण्याकरिता वन्यजीव बचाव केंद्र उभारण्यात येणार आहे.
Respect for women in the budget
महाविकास आघाडी सरकारने राज्याला नवी दिशा देणारे हे अर्थसंकल्प आहे. यात महिला वर्गासोबत, शेतकरी व समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे.
------------------
राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा - हंसराज अहीर
चंद्रपूर:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा पंचसुत्रीवर आधारलेला असल्याचे अर्थमंत्री यांनी सांगीतले असले तरी या अर्थसंकल्पात केवळ आकड्यांचा खेळ केला गेला आहे. त्यामुळे विकासाचा आभास दर्शविणाऱ्या या अर्थसंकल्पाने सर्वांचीच घोर निराशा केली असल्याची प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे. disappointment in the budget
सरकारने अनेक योजनांसाठी कोट्यवधीची उड्डाणे केली असली तरी यापूर्वीच्या अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांची परीपूर्ती करण्यास सरकारला दारुण अपयश आल्याने हे सरकार केंद्राच्या बजेट निधीतून अधिकाधिक विकास करण्याचा खटाटोप करणारे आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी सादर केलेलया या तिसऱ्या अर्थसंकल्पावर महाविकास आघाडी सरकार अंमल करेल याची सुतराम शक्यता नाही. हा अर्थसंकल्प घोषणाबाजीचा केवळ नमुनाच ठरेल असेही अहीर यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे, कष्टकऱ्यांच्या न्यायाचे, महिला सुरक्षेचे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे कोणतेही धोरण दिसत नसल्याने हा अर्थसंकल्प केवळ पोकळ वल्गना करणारा ठरेल असेही अहीर यांनी म्हटले आहे.
------------------
अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय - महापौर राखी कंचर्लावार
आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भ तसेच चंद्रपूर शहरासाठी काहीही विशेष तरतूद केलेली नाही. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची, तरुणांची आणि गृहिणींची घोर निराशा करणारा आहे,अशी प्रतिक्रिया महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली. Injustice on Vidarbha in the budget
मागील अर्थसंकल्पाच्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र, विदर्भ आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी भरघोस तरदुत केली. मात्र, या अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय झाला आहे, अशी प्रतिक्रिया महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.
------------------
सर्व घटकांना सामावून घेणारा अर्थसंकल्प
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची प्रतिक्रिया
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी (ता. ११ मार्च) विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाड्यात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. An all-inclusive budget
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची प्रतिक्रिया
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी (ता. ११ मार्च) विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाड्यात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. An all-inclusive budget
या शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतिशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने आणण्याच्या दृष्टीने विशेष कृती योजनेअंतर्गत तीन वर्षांत १ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. Farmers' budget
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. शेततळ्यांच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा करण्यात आली असून, त्यामाध्यमातून स्वयंरोजगारासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार आहे. शेती, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग अशा सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली आहे.
---------------------
राज्यसरकार ने सादर केलेला अर्थसंकल्प दिशाहीन - डॉ.मंगेश गुलवाडे
राज्यातील आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प विकासाच्या मुद्द्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न असून दिशाहीन अर्थसंकल्प असल्याचे मत भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले. Directionless budget
तसेच चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असतांना अनेक लोककल्याणकारी प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात सुरू केली होती त्यातील काही प्रकल्प निधी अभावी अपुरे आहेत आणि अशा प्रकल्पांसाठी कुठेही नियोजन या अर्थसंकल्पात दिसत नाही व चंद्रपूर जिल्ह्यासाठी कुठलाही नवीन प्रकल्प देखील प्रस्तावित केलेला नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षांचे भंग झाल्याचे भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना सांगितले
