चंद्रपूर - ब्रेकअप करण्यापूर्वी आपण एकदा भेटू असे म्हणत 22 वर्षीय प्रियकराने आपल्या प्रेयसीला भेटायला बोलाविले, मात्र काही वेळात प्रेयसीचा मृत्यू झाला, सदर घटना वाऱ्यासारखी पसरली असता प्रियकराने च त्या युवतीची हत्या केली अशी चर्चा सुरू झाली.
प्रियकर हा म्हणत आहे की चारचाकी वाहनांच्या धडकेत त्या युवतीचा मृत्यू झाला मात्र युवतीच्या खाजगी पार्ट रक्ताने माखला असल्याने पोलिसांचा संशय प्रियकरावर वाढला.
मात्र त्या युवतीचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची माहिती त्या युवकाने दिली. Mystery
पोलीस सदर प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे ।तर शवविच्छेदन प्रक्रियेला वेळ लागत असून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांनी सामान्य रुग्णालय गाठत मृतक युवतीच्या कुटुंबियांना सांत्वन देत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी केली, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. Die young girl
यावेळी भाजप शहराध्यक्ष मंगेश गुलवाडे, नगरसेवक सुभाष कासंगोट्टुवार, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे, राहुल विरुटकर हे उपस्थित होते.