News34 gadchandur
गडचांदूर - गडचांदूर येथे एका शेतकऱ्याने येथील एका शेतात दुपट्ट्याच्या सहाय्याने झाडाला लटकून आत्महत्या केल्याची घटना 7 फेब्रुवारी रोजी घडली. चंदु नवसू गजर वय वर्ष अंदाजे 59 असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तो यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात कान्होली गावाचा रहिवासी असून त्याठिकाणी त्याची शेती असल्याचे कळते.काही दिवसांपूर्वी तो गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 1 आपल्या मुलांकडे आला होता. Farmer suicide
नुकताच तो काही कामा निमित्य स्वगावी जावुन आला होता.अशी माहिती असून आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असले तरी त्याच्यावर Bank loan बँकेचे कर्ज होते आणि यंदा शेतात नापिकी झाल्याने कर्जफेड कशी करायची या विवंचनेत तो होता. कदाचित याच कारणामुळे त्याने हा टोकाचा पाऊल उचलला असावा अशी शंका जनमाणसातून व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेताला शवविच्छेदनासाठी postmortem रूग्णालयात पाठवले.पुढील तपास ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
