News34 chandrapur
चंद्रपूर : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मत मांडताना खासदार बाळू धानोरकर यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हंटले आहे कि, राष्ट्रपतींचे भाषण अर्धवट व देशातील महत्वपूर्ण मुद्द्यांचा अभाव असलेले हे अभिभाषण आहे.
पंतप्रधान दिवसरात्र जे बोलत असतात. त्याच गोष्टींचा समावेश यात आहे.
Member of parliament balu dhanorkar
कोरोना काळात सरकारी अव्यवस्थेमुळे जवळपास ५० लाख पर्यंत मृत्यू झाले त्याबाबत काहीही उल्लेख नाही. तसेच मृतकाच्या परिवारांना काय मदत केल्या गेली, याचा देखील यात उल्लेख नाही. Corona kills 5 million civilians
यात सरकारच्या संवेदनशील पणाचा उल्लेख झाला. पण काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांना एक वर्ष रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागले. Death of 750 farmers
यात ७५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला या गोष्टींचा देखील या अभिभाषणात विसर पडलेला दिसतो. प्रधानमंत्री आवास योजनेचे ४ करोड घरे होणार होती. पण अर्धे उद्दिष्ट सुद्धा साध्य झालेले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा देखील हवेतच विरली.
सबका साथ सबका विकास चे नारे खूप दिलेत पण वास्तवात एस. टी, एस. सी. ओबीसी महिला व अल्पसंख्याकांवरील हल्ल्याबाबत यात कुठेही वाच्यता झाली नाही. या मोदी सरकारकडून रेल्वे पासून जहाजापर्यंत सर्वच विक्री होण्याची भीती आहे. केवळ कार्यक्रम घोषित होतात, मात्र वास्तवात अंधकार आहे. राष्ट्रपती यांचे अभिभाषण हे भविष्याचा वेध घेणारे भाषण असते. परंतु यावेळी केलेले भाषण हे निवडणुकीचा भाषणाप्रमाणे असल्याचे दिसून आले आहे.
