गडचांदूर :-अखील भारतीय मादगी समाज संघटना कोरपना तालुक्याच्या वतीने हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिला सबलीकरण व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन नोकारी(पा.)येथे करण्यात आले.अध्यक्षस्थानी मादगी समाज संघटनेच्या विदर्भ उपाध्यक्षा सौ.वनीता लाटेलवार होत्या.तर जिल्हाध्यक्ष शंकर पेगडपल्लीवार उद्घाटक म्हणून उपस्थित होते.जिल्हा सल्लागार बाबूराव कमलवार,तालुका सल्लागार मारोती कुचनकर,नोकारीच्या माजी सरपंचा मनिषा चेन्नूरवार, सदस्या प्रीती चौधरी,सुषमा कन्नूरवार,रेखा रेनकुटावार कळमना,आनंद रेकुटवार सामाजिक कार्यकर्ते कळमना, तालुका सहसचिव रेशमा तोतापल्लीवार, नोकरी गावचे जेष्ठ नागरिक सुधाकर घागरे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी हळदी कुंक सणाचे म्हत्व व त्या मागच्या इतिहासाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.यानिमित्ताने मादगी समाज संघटनेची गाव तिथे शाखा उघडण्याचे आवाहन करण्यात आले.
नोकारी गावात शाखा उघडण्यात आली. त्यामध्ये महिला व पुरूष कार्यकारिणी गठित करण्यात आली.महिला आघाडीत नोकारी शाखा अध्यक्षा सौ.माया कोगरे,उपाध्यक्षा सौ. पुजा कन्नुरवार,सचिव सुषमा ईश्वर कन्नुरवार तर शितल कन्नुरवार,छाया खोब्रागडे,शिवानी कन्नुरवार यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.तसेच पुरूष आघाडीत संतोष कन्नुरवार अध्यक्ष,शैलेंद्र कन्नुरवार उपाध्यम,संजय चेन्नूवार सचिव,सुधाकर घागारे सल्लागागार तर सदस्य म्हणून चंपत कन्नुरवार,प्रेमदास चेन्नूरवार,रविंद्र कन्नुरवार यांची निवड करण्यात आली.याचबरोर रविन्द्र येमुलवार ऊप्परवाही,विजय कामपेल्ली मात्रा, शरद लिंगमपेल्ली सात्री,अमरदीप घागरे नांदाफाटा, राकेश पुगुरवार नांदाफाटा,अतुल पेगडपल्लीवार उप्परवाही,अंबादास मोहुर्ले उप्परवाही, भीमराव पेगडपल्लीवार उप्परवाही,शंकर चिलमुलवार नांदाफाटा यांचा तालुका कार्यकर्ते म्हणून समावेश करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे संचालन बुदेश्वर गोरडवार,आभार अनिल अरकिलवार यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका कमेटी अध्यक्ष ईश्वर कन्नूरवार,उपाध्यक्ष अनिल अरकीलवार, सचिव बुद्धेश्वर गोरडवार,रमेश चीपाकृतीवार,सुरेश तोतापल्लीवार,रवी शिंदेकर, मारूती कुचनकर,देवराव मोहारे,सुरेश खोब्रागडे यांनी केले.