News34 Chandrapur
चंद्रपूर - 28 ऑक्टोबरपासून राज्य परिवहन महामंडळाचे Msrtc कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान, एसटी विभागाने आपल्या वतीने बसेस चालवण्यास सुरुवात केली आहे. 2 फेब्रुवारीला एकूण 53 बसेसने प्रवाशांची सेवा केली आहे. मात्र 192 बसची चाके आजही अडकली आहेत. State Transport Corporation maharashtra
चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि चिमूर आगारातून एकूण 245 बसेसची सेवा देण्यात येत होती. मात्र आंदोलनानंतर रापम यांनी Retired चालक आणि व्हीआरएस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बसेस चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे बसेसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2 फेब्रुवारीला चंद्रपूर आगाराच्या 29, वरोराच्या 9, राजुरा आगाराच्या 7 आणि चिमूर आगाराच्या 8 अशा एकूण 53 बसेसने प्रवाशांची सेवा केली आहे. Merge ST Corporation into Government