News34 Chandrapur
चंद्रपूर - तंत्रज्ञानाच्या या युगात आजची काही पिढी चांगल्या मार्गाने तर काही वाईट मार्गाकडे वळत आहे, ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास राज्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने शाळा, महाविद्यालये बंद झाले, आज विषाणूचा ओघ कमी झाला मात्र मुंबई मधील Youtuber Hindustani bhau ने विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावा यासाठी सर्वांनी एकत्र येत आंदोलन करा असे आवाहन केले.
हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर तरुणाई रस्त्यावर उतरली आणि शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले, एकाच्या सांगण्यावरून मूर्ख पणासारखे पाऊल उचलणारी ही तरुणाई खरच न समजण्यासारखी आहे.
हे तर झालं खरे उदाहरण आता 2 फेब्रुवारीला चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात 4 वाजताच्या सुमारास अश्लीलतेचा थरार बघायला मिळाला.
वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोरा नाका चौकात सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन पत्रकार संघाच्या इमारतीसमोर असलेल्या उड्डाणपुलाच्या पिल्लर समोर येऊन उभी राहली.
वाहनाला black film असल्याने आत असलेल्या तरुण व तरुणीला आतील दृश्य कुणाला दिसत नसणार असा आभास झाला मात्र वाहनांच्या आत सुरू असलेले अश्लील चाळे सर्वाना स्पष्ट दिसायला लागले.
काही महिन्यांपूर्वी वरोरा नाका उड्डाणपुलाचा एक भाग सुरू झाला नव्हता त्यावेळी त्या भागावर तरुण तरुणी चुंबन प्रेम करू लागले. Thrill of obscenity
डिजिटल माध्यमांनी बातमी प्रकाशीत केल्यावर तो भाग सुरू झाला मात्र आता वर्दळीच्या ठिकाणी भर दुपारी असे प्रकार सदर तरुणाई करीत आहे.
वाहनांच्या आतील सुरू असलेले अश्लील चाळे काही वेळपर्यंत असेच सुरू होते, काही वेळाने तरुणांचा व तरुणीचा मित्र त्या वाहनजवळ आले व ते वाहन तिथून दुसऱ्या ठिकाणच्या शोधात गेले.
मात्र या दृश्यांचा आस्वाद बाहेर उभ्या असलेल्या काही आंबट शौकिनानी आवर्जून घेतला.