News34 Gadchandur
गडचांदूर :- नांदाफाटा परिसरात हल्ली भुरट्या चोरांनी कमालीचा धिंगाणा घातला आहे.
दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पंप, Cable,पाईप अशा शेती उपयोगी महत्वाच्या वस्तूंवर चोर राजरोसपणे डल्ला मारत आहे.
गहु,हरभरा,कांदा या सारखे रब्बी पीक घेण्यासाठी नांदा येथील शेतकरी त्र्यंबक लक्षण चौधरी यांनी दोनदिवसापुर्वी स्वतःच्या शेताला लागुन असलेल्या नाल्यावर पाणी घेण्यासाठी पंप लावला होता. तो पंप चोरट्यांनी लंपास केला.शेतात पिकांचा फुलोरा डोलत असल्यने पिकांना पाणी देण्याच्या उद्देशाने तो पंप सुरू करण्यासाठी नाल्यावर गेले असता त्याठिकाणी पंप आढळला नाही. Theft of agricultural pumps
पंप चोरीला गेल्याची खात्री पटल्यावर त्र्यंबक यांनी गडचांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीप्रमाणे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.अगोदरच पिकांच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. निसर्गाच्या अवकृपेने बळीराजा अक्षरशः वैतागला असून कर्जबाजारी झाला आहे.लहान मुलासारखी जपलेली पिके डोळ्यादेखत पाण्याशिवाय मरत असताना अशा परिस्थितीत 20 ते 25 हजारांचा नवीन पंप घेणे अवघड होऊन बसले आहे.अशा परिस्थितीत तो दुसर्याकडून पाणीची व्यवस्था करून पिकांना जगवेलच. मात्र भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी या भुरट्या चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
