News34 Chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कॅन्सर केअर फाउंडेशन व टाटा ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून एक अत्याधुनिक 'डे केअर केमोथेरपी सेंटर'ला सुरवात झाली आहे.
यामूळे कॅन्सर(कर्करोग)च्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे.सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरवर येथे उपचार होणार असल्याने याचा सर्वाधिक लाभ चंद्रपूर, वर्धा,यवतमाळ,गडचिरोली व लगतच्या आंध्रप्रदेशातील रुग्णांना होणार आहे.
मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनात आले.सन 2013 पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात ही बाब उघडकीस आली.या कार्यक्रमा अंतर्गत प्रामुख्याने कर्करोग,मधुमेह,ब्लड प्रेशर व इतर रुग्णांचा शोध घेण्यात येतो.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर मुखाचा (Oral cancer)कर्करोग,दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाचा (सर्व्हायकल कॅन्सर) तर तिसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (Breast cancer)कर्करोग असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. कर्करोगाची तीव्रता बघून रुग्णांना नागपूर मेडिकल कॉलेज किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूट शिवाय पर्याय न्हवता.परंतु आता चंद्रपुरात 'डे केअर कॅन्सर केमोथेरपी युनिट' सुरू झाल्याने रुग्णांच्या वेळेची व पैश्यांची बचत होणार आहे. सामान्य आरोग्य विभाग, जिल्हाशल्यचिकित्सक व चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांच्या सहकार्यातून हे 'डे केअर युनिट'टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेत सकाळी 9 ते सायं.6 वाजे पर्यंत सुरू राहणार आहे.
Day Care Cancer Chemotherapy Unit
जागतिक कर्करोग दिनाला झाले उदघाटन
दरवर्षी 4 फरवरीला World Cancer Day पाळण्यात येतो.त्याचेच औचित्य साधून चंद्रपुरात 'डे केअर सेन्टर 'चे उदघाटन शुक्रवार( 4 फरवरी 2022)ला उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी आयएमए अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,सचिव अनुप पालीवाल,अधिष्ठाता डॉ.अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड,टाटा मेडिकल कॉलेज मुंबई अधिष्ठाता व कॅन्सर केअर फाउंडेशनचे संचालक डॉ.कैलास शर्मा यांचेसह डॉ. भास्कर सोनारकर, डॉ.मनीषा घाटे,डॉ.प्रसाद पोटदुखे, डॉ.अशोक गजभिये, डॉ.शैलेंद्र जांभुलकर,डॉ.सारिका ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अत्याधुनिक साहित्यासह 8 बेडची स्वतंत्र सोय
डे केअर सेंटरमध्ये सर्व प्रकारची महागडी औषधी,डॉक्टर्स व कर्मचारी मंडळी Tata Trust टाटा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.यात बायोसेफ्टी कॅबिनेट,लॅमीनर फ्लो व मल्टि पॅराचा प्रामुख्याने समावेश आहे.केमोथेरपीचे सायकल असतात, कधी कधी केमोथेरपी झाल्यावर रुग्णांना त्रास झाल्यास पुढील उपचाराची गरज भासते,म्हणून 8 बेडची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
डॉ.निवृत्ती राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक
जि.सा.रुग्णालय,चंद्रपूर.
हा तर महत्वपूर्ण प्रकल्प
बऱ्याच रुग्णांना कॅन्सर झाला हे,तिसऱ्या किंवा चौथ्या पातळी(स्टेज)वर कळते.आणि मग तो भांबावतो.अश्या रुग्णांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वपुर्ण आहे.डे केअरला आयएमए तर्फे सर्व सहकार्य दिले जाईल.
डॉ.मंगेश गुलवाडे
अध्यक्ष
आयएमए चंद्रपूर.

