News34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- दिनांक पाच फेब्रुवारी 2022 रोजी कवियत्री जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा महिला कार्याध्यक्षा सौ. शशिकला नामदेवराव गावतुरे यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त मुल येथील वॉर्ड नंबर १ मधील साई मंदिर येथे एक आगळा वेगळा अभिनव असा 'सासू-सून आगळा वेगळा मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन स्नुषा डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आयोजित करुन समाज बांधवांना एक नवा संदेश प्रबोधनाच्या माध्यमातून दिला आहे.
मुल येथे अशा स्वरूपाचा पहिलाच सामाजिक अभिनव उपक्रम असून या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये समाज प्रबोधन तसेच सासू सुनेचे नाते व संसार वृंधीगत झाल्याच्या प्रतिक्रिया समाजात केल्या जात आहेत. यात महिला व मुलांचे गमतीदार खेळ घेण्यात आले असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या अभिनव उपक्रमा प्रसंगी मंचावर सत्कारमूर्ती सौ.शशिकला गावतुरे, ऍड.राजश्री ठाकरे, सौ. दयाबाई महाडोळे, सौ. निशा मोहूर्ले, पर्यावरण संवर्धन समितीच्या विभागीय सचिव रत्ना चौधरी, माधुरी निकूरे, काजल मेकलवार, विमलताई भरणे उपस्थित होत्या.
सासू-सून मेळाव्याला संबोधित करताना सौ.शशीकला गावतुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सासू -सून या कुटुंब व्यवस्थेतील दोन प्रमुख व्यक्ती व आधार स्तंभ आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये या नात्यात कटुता आलेली आहे. परंतु या दोन महत्वाच्या व्यक्ती मधील दैनंदिन संबंध सुधारावा, प्रेम वाढवा, त्यांच्यातील नाते बळकट होऊन पुढेही वृंधीगत राहावे व परिणामी कौटुंबिक स्वास्थ्य सुधारावे, तसेच घरातील मुलाबाळांच्या संगोपन एका सुदृढ वातावरणात व्हावे यासाठी सासू-सुनांचं नातं एक मैत्रीपूर्ण नातं समाजासमोर राहावं, अशा वातावरणात फक्त कुटुंब प्रगती करत नाही तर समाज सुद्धा प्रगती करतो अशी भावना आपल्या शब्दातून व्यक्त केली.
याप्रसंगी बालरोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मुलांच्या संगोपना मध्ये, आदर्श पिढी घडवण्यामध्ये सासू-सुनेचं सौहार्दपुर्ण नातं आणि त्यांच्या कर्तव्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचा अमूल्य संदेश समाजा समोर ठेवला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती असलेले डॉ.समीर कदम यांनी महिलांना सामाजिक कार्यात सहभागाबद्दल चे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन सौ. निशा दडमल मोहुर्ले यांनी केले तर सौ. सीमा लोनबले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ पुनम मोहुर्ले, राकेश मोहुर्ले, सौ मेकलवार, सौ स्वाती मोहुर्ले, ममता गुरनुले, माधुरी निकुरे, विमलाबाई धारने, काजल मेकलवार, कपिलाताई मोहूर्ले यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी नेफडोच्या पदाधिकारी तेजस्विनी नागोशे,रत्ना चौधरी, ललिता मुस्कावार,कविता मोहूर्ले, नंदा शेंडे, अल्का राजमलवार, सौ.बाडगे मॅडम,रेखा पोकळे यांनीही रूक्षभेट पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच समता परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, पत्रकार गुरु गुरनुले, गंगाधर कुणघडकर, डॉ. केवल कऱ्हाडे, युवराज चावरे,देवराव ढवस, विनोद आंबटकर, टिकले सर, प्रा.चुदरी आदी शुभचिंतकानी घरी जाऊन शशिकला गावतुरे यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतला. शुभेच्छा देताच कवियत्री गावतुरे यांनी बाल काव्यकुंज पुस्तक सर्वांना भेट दिले. यावेळी नामदेवराव गावतुरे, डॉ.राकेश गावतुरे उपस्थित होते.
