News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
"आजचे युग हे स्पर्धेचे आहे,यामध्ये विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करावे.त्यासाठी शालेय अभ्यासाबरोबरच शाळा, महाविद्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या सुप्त गुणांचा विकास करावा.
कठोर परिश्रमाशिवाय यश संपादन करता येत नाही" असे मोलाचे मार्गदर्शन संस्थाध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले यांनी विद्यार्थ्यांना केले. ते गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय येथे वर्ग 11वी कडून 12 वी करीता आयोजित निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रमा दरम्यान अध्यक्षस्थानावरून बोलत होते.सदर कार्यक्रमात न.प.सभापती सौ.कल्पना निमजे,राकाँ ओ.बी.सी.सेल जिल्हाध्यक्षा शुभांगी डोंगरवार यांची विशेष अतिथी तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी.आर.काळे,प्रा.वांढरे, प्रा.सैय्यद जहीर, प्रा.मेहरकुरे, प्रा.खान,प्रा. सातारकर, प्रा.सुरपाम, प्रा.ताजने, प्रा.मुप्पीडवार सह इतरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले.त्याचबरोबर राकाँ ओ. बी.सी. सेलतर्फे 10 वी व 12 वीत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.संचालन विद्यार्थिनी कु.साबिया शेख व कु.शालिनी सांगडे,प्रास्ताविक कु.वंदना मंडाळी तर आभार रोहित पेंदोर यांनी व्यक्त केले.प्रा.प्रशांत खैरे,प्रा.दिनकर झाडे,प्रा. प्रवीण डफाडे, प्रा.रमेश सोनटक्के, प्रा.गुजर,प्रा. पोडे, प्रा.भगत, गणपत आत्राम व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
