News34 Chandrapur
चंद्रपूर - कर्नाटक एम्टा कोळसा उत्पादन कम्पनी शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करीत आहे.या संदर्भात सगळ्या लोकप्रतिनिधींनीं मूग गिळली आहे.
मौजा चीचोर्डा येथी 298, 05 हेक्टर जमीन किलोनी या ब्लॉक मध्ये येत असतांना कर्नाटक एम्टा कंपनीने 112.87 हेक्टर जमीन खरेदी केली उर्वरित 185 हेक्टर जमिनी अद्यापही संपादित केल्या नाही. त्यामुळे शेतकर्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
सर्वांना निवेदन देऊन काहीच होत नसल्याने किमान 250 प्रकल्प बाधित शेतकरी येत्या 3 मार्चला खाण परिसरातच सामूहिक मरण पत्करतील, अशी धक्कादायक माहिती दिलीप किसन मांढरे या प्रकल्प बधिताने मंगळवारला पत्रपरिषदेत दिली.या संदर्भात 3 फेब्रुवारीला President of india राष्ट्रपतींना पत्र पाठविल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रकल्प बाधित शेतकरी सूर्यकांत गौरकर, मोहन दुधे,अब्दुल शेख पवन मांढरे, चंपतराव आस्वले, पांडुरंग ढपकस,पुरुषोत्तम दुपारे यांचेसह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
दिलीप मांढरे म्हणाले,भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा आणि लगतच्या इतर भागात गेल्या 14 वर्षापासुन कार्यान्वीत असलेली Karnataka Power Corporation कर्नाटका पावर कार्पोरेशन लिमि. बंगलोर प्रणित एकात्मिक बराज खुली coal Mine सहा कोल ब्लॉक मध्ये विस्तारीत आहे. यात बरांज, किलोणी, मानोरा डीप व मानोरा या coal block कोल ब्लॉकचा समावेश आहे. ही खान सन 2007 पासून कार्यान्वित असुन सद्या किलोणी ब्लॉक मधून कोळशाचे उत्खनन, वहन व विक्री सुरू आहे. त्या माध्यमातुन कंपनी अब्जो रूपये नफा कमवित आहे. किलोणी ब्लॉक बरांज मो. व भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील मौजा चिचोर्डी या दोन सीमेमध्ये आहे. सध्याचे उत्खनन बरांज मो. या ग्रामपंचायत क्षेत्रातील भागात सुरू आहे. नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या याच ब्लॉक मध्ये मौजा चिचोर्डी या भागातील आम्ही शेतजमीन मालक आहोत. आमच्या शेतजमीनीला लागूनच उत्खनन सुरू आहे.आमच्या शेतजमीनी नगर परिषद क्षेत्रात येत असल्याने त्याचे शासकिय दर जास्त आहे. याच कारणाने कंपनी आमच्या शेतजमीनी घेण्यास टाळाटाळ करीत आहे. असा आरोप त्यांनी केला.
कुणीही लक्ष देण्यास तयार नाही
एम्टाने सीमेचा भागही उत्खनन करून कोळसा काढणे सुरू केले आहे. या माध्यमातून कंपनी दररोज कोट्यावधी रूपये कमवित आहे. या खाणी मुळे आम्हाला शेती करणे अवघड झाले आहे. आमच्या शेतजमीनी घेण्याकरिता कंपनीकडे अनेकदा निवेदने देवुन आणि प्रत्यक्ष भेटुन त्यांना विनंती केली तसेच राज्य व केंद्र शासनास सुध्दा निवेदने पाठविले आहे. स्थानीक पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन यांचे कडे सुध्दा आमच्या समस्या चे निवेदन आम्ही भेटुन सांगीतले आहे. मात्र याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने अखेर दि. 3 फेब्रुवारी 2022 ला महामहिम राष्ट्रपती यांचे कडे इच्छा मरणाची मागणी केली. या निवेदनाच्या प्रती मा. पंतप्रधान, केंद्रीय कोळसा खान मंत्री, मुख्यमंत्री, महसुल मंत्री यांच्या सह इतरांना पाठविल्या आहे. Will death allowed
अखेर आम्ही सर्व प्रकल्पग्रस्तांनी महामहिम राष्ट्रपती यांनी आम्हाला इच्छा मरणाची परवानगी दिली असे समजुन 3 मार्च 2022 ला खाण परिसरातच सामुहीक इच्छा मरणाचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती सूर्यकांत गौरकर यांनी दिली.
