News34 Ghughus
घुग्घुस - उपसरपंच यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कादिर शेख जामिनावर बाहेर आला होता मात्र 19 फेब्रुवारीला कादिर ची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती.
घटनेनंतर घुघुस शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व पोलीस प्रशासनाने वेळीच परिस्थिती हाताळल्याने तणावाचे रूपांतर शांततेत झालं. Murder mystery
घटनेच्या 3 दिवसांनी घुघुस पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली आहे.
Murder case
घटनास्थळ परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज घेतले आहे. तर घुग्घुस पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करून विविध राज्यात आरोपीच्या मागावर पाठविल्याची माहिती मिळाली आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपीना कलम 302,43,48 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली मात्र नावं गुप्त ठेवण्यात आले. आरोपीना न्यायालयात हजर केले असता 24 फरवरी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पोनि बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संजय सींग करीत आहे.
