घुघुस - धानोरा टोल नाक्याजवळ काही अज्ञात लोकांनी वाहन चालकांना मारहाण करीत त्यांना चाकू चा धाक दाखवीत त्यांच्याजवळील पैसे हिसकावले.
5 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक MH400815 मालगाव वरून परत येत असताना वाहन चालकाला झोप आली असता त्याने ट्रक धानोरा टोल नाक्याजवळ थांबवित वाहनचालक धीरज वीरेंद्र प्रसाद ट्रक मध्ये झोपी गेला. Voluntarily causing hurt in committing robbery
मात्र काही वेळानंतर 4 अज्ञात लोकांनी ट्रक मध्ये प्रवेश करीत यादव यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याजवळील पैसे हिसकावले. Toll Naka
त्याच परिसरात बाजूला उभा असलेल्या ट्रक चे वाहनचालक महेंद्र कुमार दुबे याला लोखंडी रॉड ने मारहाण करीत पैसे लुटले.
IPC Section 394
सदर घटनेची धीरज यादव ने यासंदर्भात घुघुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असता पोलिसांनी कलम 394, 34 अंतर्गत अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
नव्याने रुजू झालेले घुघुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन फुसाटे यांना अज्ञात आरोपीनी त्यांना आव्हान दिले आहे.
