चंद्रपूर - विदर्भात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून समाजाचे Political reservation, विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती, Census यासारखे अनेक प्रश्न आहेत.
हे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून समाजाचे संघटनात्मक बांधणी साठी व जगृतीसाठी दौरे करणार असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश congress obc cell चे नवनियुक्त पूर्व विदर्भ अध्यक्ष ॲड गोविंदराव भेंडारकर यांनी व्यक्त केले आहे. चंद्रपूर येथील विश्रामगृह येथे आयोजित काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे, प्रदेश संघटक धनराज मुंगळे, प्रदेश सरचिटणीस गुरूदास चौधरी, दिपक पाटील वाढई यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड भेंडारकर यांचा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे वतीने सत्कार करण्यात आला. Obc reservation
प्रास्ताविक ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी केले. यानंतर जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बांधणी बाबत चर्चा करण्यात आली व आढावा घेण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, धनराज मुंगळे, गुरूदास चौधरी यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी विभागाचे वतीने 10 मार्च रोजी चंद्रपूर येथे आयोजीत मोर्चाचे नियोजन बाबत देखील चर्चा करण्यात आली.
बैठकीचे संचालन शहर जिल्हा ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी केले. यावेळी राहुल ताजने, गणेश दिवसे, विलास डांगे, अजिंक्य पाटील मारकवार,तपासे, वसंता उमरे, आशिष वांढरे, प्रदीप तळवेकर, पाचभाई आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
