News34 Chandrapur
चंद्रपूर : देशाचे Constitution आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून संविधान आणि पर्यायाने देशाला कमजोर करण्याचे काम सतत सुरु आहे. देश वाचवायचा असेल तर काँग्रेस शिवाय दुसरा पर्याय नाही.
त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना काँग्रेस सोबत जोडले पाहिजे. २०२२ मध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निडवडणुकीबरोबर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरच देशात लोकशाही आणि संविधान अबाधित राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी काँग्रेस विचारधारेशी जोडून पक्षाला विजय मिळवून देण्याचे काम करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते भद्रावती येथे आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका भद्रावती तर्फे आयोजित Digital member registration प्रशिक्षण शिबीर व पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
Chandrapur congress
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, डिजिटल ट्रेनर मनीष तिवारी, तालुका अध्यक्ष भद्रावती प्रशांत काळे, भद्रावती शहर अध्यक्ष सुरज गावंडे, तालुका अध्यक्ष वरोरा मिलिंद भोयर, शहर अध्यक्ष वरोरा विलास टिपले, सभापती पंचायत समिती वरोरा रवींद्र धोपटे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजू चिकटे, उपसभापती संजीवनी भोयर, महिला तालुका अध्यक्ष भद्रावती वर्षा ठाकरे, शहर अध्यक्ष भद्रावती सरिता सूर, सुधीर मुळेवार, रत्ना अहिरकर, विजय डोंगरे, नगरसेविका जयश्री दातारकर, प्रतिभा निमकर, शीतल गेडाम, लीला डुमणे यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, काँग्रेस पक्षाने महिलांचा कायमच सन्मान करीत त्यांना सामान संधी देण्याचे काम केले आहे. याच धोरणातून राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यपाल सारख्या महत्वाच्या संविधानिक पदांवर महिलांना काँग्रेसने संधी दिली आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रिय व्हावा म्हणून प्रत्येक जिल्हा काँग्रेस समितीमध्ये एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याच्या निर्णयही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने घेतला आहे. महिलांना राजकीय प्रवासात सामील करून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय काँग्रेस सरकारने घेतला. आताही UP Election उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ४० टक्के जागांवर महिलांना उमेदवारी देण्याच्या क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या देशात खऱ्या अर्थाने महिलांच्या सन्मान करणारा पक्ष काँग्रेस आहे. असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय म्हणाले कि, सत्य हा काँग्रेस विचारधारेचा आत्मा आहे. तर जुमलेबाज हि भाजपची विचारधारा आहे. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी संगणक क्रांती आणली. त्यामुळे आपण आज डिजिटल इंडियाची घोषणा करू शकलो. परंतु फक्त miss call करून जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणणारा भाजप हा मिसकॉलच्या माध्यमातून एक नंबरचा पक्ष झाला आहे. अशी टिका त्यांनी केली. यासह अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
