घुघुस - फेसबुकवर झालेला वाद आधी शिवीगाळ व नंतर हत्येपर्यंत पोहचला, राज्यात 19 फेब्रुवारीला शिवजयंती चा उत्साह होता तर घुघुस शहरात हत्येचा कट रचण्यात आला.
Facebook argument
19 फेब्रुवारीला रात्री 10.30 नंतर घुघुस येथील Bank Of India परिसरात 26 वर्षीय कादिर शेख आपल्या मित्रांसमवेत बसून होता, त्याचवेळी 4 ते 5 युवक कादर जवळ आले, व कादिर ला काही समजण्याआधी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर चा मारा केला. Murder case
त्यानंतर कादिरची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
6 वर्षाआधी नकोडा उपसरपंच मोहम्मद आरिफ यांच्या हत्येप्रकरणी कादिर हा आरोपी होता, काही दिवसांपूर्वी कादिर जामिनावर बाहेर आला होता.
ज्या ठिकाणी कादिरची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी कादिर ने तलवारीच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता अशी परिसरात चर्चा आहे.
काही महिन्यांपूर्वी फेसबुक वर झालेल्या वादात मृतक कादिर शेख, राजेश कंकटवार, अतुल वनकर व अविनाश वनकर यांच्या मारहाण झाली होती.
त्यामध्ये कादिर शेख ने राजेश यांच्या हातावर चाकूने वार केला होता, या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले होते. Crime news
दोन्ही पक्षांना पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा अशी घटना घडू नये याची समज देण्यात आली होती.
मात्र 19 फेब्रुवारीला कादिर यांची बँक ऑफ इंडिया परिसरात हत्या करण्यात आली, आरोपीनी शस्त्राचा धाक दाखवीत कादिर च्या मित्रांना हुलकावणी दिली.
आरोपीनी कादिरच्या गळ्यावर व हातावर शस्त्राने वार करीत हत्या केली. Murder mystery
परिसरात लागलेल्या cctv कॅमेराच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहे.
हत्याकांडानंतर मृतकांच्या परिजनांनी राजेश कंकटवार यांच्या घरासमोर ठेवलेले चारचाकी वाहन आगीत भस्मसात केले.
घटनेनंतर घुघुस परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली, प्रकरणाची गंभीरता बघता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आढावा घेतला व आरोपीना तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांना निर्देश दिले.
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांनी शांतता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
