News34 warora
वरोरा - मकरसंक्रांतीचा महिना म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा जानेवारी, या महिन्यात लहानापासून ते मोठे पतंग उडविण्यात व्यस्त असतात.
मात्र हा छंद कुणाच्या जीवावर बेतू शकतो अशी घटना 28 जानेवारीला वरोरा तालुक्यातील बोर्डा या गावी घडली.
सकाळी 9 वाजेदरम्यान बोर्डा येथील 12 वर्षीय मुलगा आदित्य उमेश येटे हा घराच्या जिन्यावरून पतंग उडवीत होता, मात्र पतंगीच्या मांजाचा स्पर्श हा घरावरील उच्च विद्युत प्रवाह असलेल्या ताराला झाला आणि होत्याचे नव्हते झाले. Nylon manja
मांजा चा तो स्पर्श आणि एक मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला.
आदित्य हा मोठ्या प्रमाणात भाजला गेला.
आदित्य च्या आईवडिलांनी तात्काळ चंद्रपुरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले, आदित्य उपचाराला प्रतिसाद देत नव्हता, त्याला तात्काळ नागपुरात रेफर करण्यात आले होते. Chandrapur news
मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने वडिलांनी मदतीची हाक लावली, काही प्रमाणात मदतही मिळाली मात्र मृत्यूशी झुंज देताना आदित्य अपयशी ठरला, तब्बल 23 दिवसांनी आदित्यचा मृत्यू झाला.
आदित्यच्या आई वडिलांवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला.
