News34 Mul
मूल (गुरू गुरनुले)
शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या Cdcc bank, chandrapur चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यममातून राबविण्यात येत असलेल्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मारोडा येथील शेतकरी महीला सौ. बबीता अनिल वाळके हीला Cancer आजारावर उपचार करण्यासाठी ३० हजार रूपयाचे सहकार्य करण्यात आले.
बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मारोडा येथे आजारी बबीता वाळके यांचे घरी भेट देवुन मदतीचा Check सुपुर्द केला. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा प्रायमरी Credit सोसायटीचे अध्यक्ष धनंजय चिंतावार, बेलदार समाज संघटना मारोडाचे अध्यक्ष अशोक पुल्लावार, ग्राम पंचायत सदस्य प्रफुल पुल्लावार, माजी सरपंच प्रभु वाळके, माजी सदस्य वामन पिंपळे, सुधाकर शेंडे आणि कमलेश वाळके आदी ग्रामस्थ आणि रूग्णाचे कुटूबिय उपस्थित होते. आजारावर उपचार करण्या करीता आर्थिक सहकार्य केल्याबद्दल रूग्णाच्या नातेवाईकांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे आभार मानले.
