चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्यात आली असली तरीही आज काही भागात अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. Alcohol ban lifted
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील असलेले अब्दुल कलाम उद्यानासमोर बल्लारपूर च्या दिशेने जात असताना चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. Huge accident
काही वेळापूर्वी घडलेल्या या अपघातात चारचाकी वाहनात देशी दारूच्या असंख्य बॉटल होत्या.
सायंकाळ झाली की या मार्गावर नागरिक फेरफटका मारायला जातात, सध्या मानव-वन्यजीव संघर्ष सुरू असल्याने नागरिकांची संख्या कमी झाली आहे.
नागरिक फेरफटका मारत असताना एक चारचाकी वाहन mh34 am 5200 या वाहनाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल 5 ते 6 वेळा फिल्मी स्टाईलने पलटी झाली. Abdul kalam garden
वाहन पलटी झाल्याने कुणाला काही लागलं तर नाही यासाठी नागरिकांनी वाहनजवळ धाव घेतली, मात्र वाहनात बसलेले काही इसम नागरिकांना बघून पळून गेले.
वाहनजवळ गेल्यावर नागरिकांच्या पायाखालची वाळू सरकली, कारण त्या वाहनात असंख्य प्रमाणात देशी दारूच्या बॉटल होत्या, गर्दी मधील देशी प्रेमी नागरिकांनी आव-बघितला नी ताव दारूच्या बॉटल वर ताबा मिळवीत घरचा रस्ता पकडला.
वृत्त लिहेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.