चंद्रपूर - भाजपचा गड असलेल्या घुघुस मध्ये खासदार बाळू धानोरकर यांनी मोठ्या परिणाम खिंडार लावले.
सध्या घुघुस नगरपरिषदेची निवडणूक लागणार असल्याची चाहूल लागल्याने कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात बेडूक उडी घ्यायला लागले आहे. chandrapur news
26 फेब्रुवारीला Congress Minority Cell च्या कार्यक्रमात खासदार धानोरकर, सोहेल शेख, रमजान अली, रोशन पचारे, पवन आगदारी, सैय्यद अनवर, प्रवीण काकड़े, ताजुद्दीन शेख, सुरज कन्नुर, देवीदास चिल्का यांच्या उपस्थितीत भाजप पक्षाला राम राम करीत भाजपच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. Join Congress
सोबतच काही कार्यकर्त्यांना अल्पसंख्याक सेल चे नियुक्ती पत्र देण्यात आले ज्यामध्ये सुनिल सिल्का (जिला उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग) रोहित मंडल (जिला महासचिव अल्पसंख्याक विभाग) किरन झुजीपेल्लीवार (जिला सचिव अल्पसंख्याक विभाग) यांचा समावेश होता. Mp balu dhanorkar
यावेळी खासदार धानोरकर यांनी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानत घुघुस नगर परिषदेवर कांग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आपण कामाला लागावे, जेष्ठा पासून युवकापर्यंत कांग्रेस पक्षाची विचारधारा आपण आपल्या माध्यमातून पोहचवावी.
कार्यक्रमात असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
Election ghughus municipal council