चंद्रपूर - वर्ष 2020 कोरोना सारखा जीवघेणा विषाणू भारतात पसरला लाखो नागरिकांचे प्राण या कोरोनाने घेतले. Corona virus
या विषाणूमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले, सरकारने वेळीच नियोजन केले असते तर इतका हाहाकार माजला नसता.
आज आपण कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउन बद्दल बोलणार आहो, तो लॉकडाउन आहे चंद्रपूरचा तसा संपूर्ण देशात लॉकडाउन लागला होता मात्र चंद्रपुरात घडलेल्या अजूनही न ऐकलेल्या कहाणीला आम्ही उजाळा देत आहोत. Lock down story
ही कहाणी आहे पत्तरकराची (पत्रकार असू शकतो, पण नाही आहे, मात्र सदर व्यक्ती या क्षेत्रातला कदापि होऊ शकत नाही, उगाच विचार करून डोक्याला ताप देऊ नका) चंद्रपुरात लागलेल्या पहिल्या संचारबंदी मध्ये (आता मराठी उल्लेख) कोरोना पसरू नये यासाठी पोलिसांचा कडा पहारा होता, नागरिकांनी घराबाहेर पडून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये यासाठी प्रशासनाने आपल्या परीने नियोजन केले होते.
आता स्टोरी ला सुरुवात करूया
सायंकाळची वेळ (दिवस सध्या लक्षात नाही) एक इसम शहरातील ऐतिहासिक परिसरात आला (विचित्र पोशाखात) त्यावेळी पोलीस बंदोबस्तात सज्ज होते.
पोलिसांनी त्या इसमाला फटकारले, संचारबंदी लागू आहे आणि तू फिरत आहे, तर त्या इसमाने उत्तर दिले " मी पत्तरकार आहो, माझा अनुभव मोठा आहे, मला माझ्या देशात फिरण्याचा अधिकार आहे, अशी बडबड तो करू लागला. Journalist story
त्या इसमाच्या उत्तराने पोलिसही अवाक झाले, कारण तो इसम महिला व पुरुषाच्या सायलेंट आवाजात उत्तर देत होता, आधी पोलिसही चक्रावले की याला नेमकं म्हणायचं काय?(कारण पोलिसांना त्या आवाजात काही समजले नाही) पोलीस त्याला पुन्हा विचारू लागले तू बाहेर कशाला फिरत आहे? मात्र पुन्हा तो इसम तसाच बोलायला लागला, तो इसम पोलिसांशी हुज्जतीने वागू लागला. Chandrapur lockdown
आधीच कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूचा सामना करण्यासाठी पोलीस सतत बंदोबस्तात होते आणि वरून हा इसम हुज्जत करायला लागला.
तेवढ्यात पोलिसांनी दंडुका काढत त्याच्या पृष्ठभागावर जोरात लगावला, दंडुका लागल्यावर पोलीस पुन्हा चक्रावले कारण त्या दंडुक्याने त्या इसमाच्या तोंडून पुरुषाचा आवाज बाहेर पडला.
पोलिसांचा तो दंडुका बसल्याने त्याच्या आयुष्यात अनेक बदल झाले, त्याला मानसिक वैफल्य आले, तो सतत आपला राग समाज माध्यमांवर काढू लागला, रोज सकाळी उठल्यावर आता काय लिहू? असा विचार त्याच्या डोक्यात यायला लागला आहे.
आजही तो विचित्र विचारात असतो.....क्रमशः.......
माझ्या या वेड्या मित्रासाठी आपण Get Well Soon हा संदेश पोहचवा...
Virul Story.....लोकांच्या चर्चेतील बातमी....
