News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शासनाच्या योजनांची अमलबजावणी करुन गावाचा विकास साधने आदी कर्तव्य पार पाडत असलेल्या व ग्राम विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्राम विकास अधिकाऱ्यांलाच चिरोली येथील स्थानिक नागरिकांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे संबंधित व्यक्ती विरोधात ग्राम विकास अधिकारी यांनी मुल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Death threats मुल तालुक्यातील मौजा चिरोली ग्राम पंचायत मध्ये दिनांक १४/२/२०२२ रोजी दुपारी १२ वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभेला अध्यक्ष म्हणून श्री.भक्तदास कुंभारे होते सभेचे कोरम पूर्ण झाल्याने सभा सुरू करण्यात आली असून सभा झाल्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने सभेचे कामकाज समाप्त झाल्याचे सांगण्यात आले सभा आटोपल्यानंतर चिरोली येथील व्यक्ती प्रशांत मुरारी रामटेके यांनी ग्राम विकास अधिकारी श्री.व्ही.एम.यारेवर यांच्यासोबत निरर्थक मुद्यांना पुढे करुन वादावादी करण्याचा प्रयत्न करीत "तू गावात कसा फिरतो, तू जिथे दिसशील तिथे तुला मारल्याशिवाय राहणार नाही" अशा एकेरी भाषेत बोलून जावे मारण्याची धमकी दिल्यामुळे चिरोली ग्राम पंचायत चे ग्राम विकास अधिकारी श्री. व्ही.एम.यारेवार झालेल्या घटनेनुसार व्यथित होऊन मला माझ्या जीविताच्या सुरक्षेसाठी पोलिसात जाण्याचा निर्णय घेऊन धमकी देणाऱ्या प्रशांत मुरारी रामटेके यांचे विरोधात त्याच दिवशी तक्रार दाखल केली.आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत. गावाचा विकास करण्यासाठी नियुक्त केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनांच जर जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर अशा ठिकाणी कोणता अधिकारी येऊन विकास करेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. Gram Sabha
