चंद्रपूर:- रक्षण धरणीमातेचे फाउंडेशन तर्फे जटपुरा गेट परिसर येथे "Chalk of Shame" ही संकल्पना राबविण्यात आले. परिसरातील नागरिकांना व व्यवसायिकांना "Single use plastic" व इतर प्लास्टिक बद्दल होणाऱ्या दुष्परिणामा बद्दल संस्थेच्या सदस्यांनी रस्त्यावर संदेश लिहून जागरूक केले.
कोरोना च्या काळात शाळा बंद असल्या मुळे लहान मुले घरीच असतात किंवा बाहेर खेळत असतात आणि त्याच बरोबर लहान मुलांना शिकवणे अवघड होत असेल. पण त्यांना चूकीची वाट दाखवून त्यांचा आणि स्वतःचा आयुष्य धोक्यात टाकू नये.
शाळेत गुरू चा स्थान आणि मान मोठा असतो तसेच घरी आई वडिलांचा. म्हणून त्यांना योग्य ते वाट दाखवणे आपली जवाबदारी आहे. शाळेत अनेक विषयां मध्ये मुलांना काही प्रयोग शिकविले जातात मग तसेच पर्यावरणा बद्दल प्रयोग आपण त्यांना शिकवायला पाहिजे की नाही?
आपण जे आज मुलां समोर करू तेच उद्या चालून ते करतील. हो की नाही? मग चला तर एक नवीन सुरूवात करूया आणि प्रदुषण व आपल्या वाईट सवयींवर मात करूया.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर, अविनाश लेनगुरे, भूषण सोनकुसरे, राजीव शेंडे, तृप्ती गौरकार, रश्मी कोटकर, वेदांत सोनकुसरे, श्रेयस शेंडे, विशाल पेंदोर, गौरव वरारकर, माधुरी शेंडे, ज्योत्स्ना गौरकार, ईशा वरारकर, रिदम कोटकर आदी उपस्थित होते.

