News34 chandrapur
चंद्रपूर - कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर देशात रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती, आज रेल्वे वाहतूक बंद होऊन 2 वर्षे झाली.सध्या देशात कोरोनाचा उद्रेक कमी झाला असून सुद्धा रेल्वे मंत्रालय वाहतूक सुरू करण्यास उदासीन आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई जाण्यासाठी Sevagram express सेवाग्राम एक्स्प्रेस (51196/12140) corona virus india कोरोना काळापासून बंद आहे, ती लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव रोशन लाल यांनी रेल्वे मंत्री यांना निवेदनामार्फत केली आहे, जर सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू न झाल्यास सेंट्रल रेल्वे पूर्णतः बंद करण्यात येईल असा इशारा रोशन लाल यांनी दिला आहे. NSUI ROSHAN LAL
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व तेलंगणा येथील नागरिकांना मुंबई जाण्यासाठी सेवाग्राम एक्स्प्रेस प्रवास करण्याचे एकमेव साधन होत मात्र ते बंद असल्याने अनेक भागातील, युवक, शेतकरी, कॅन्सरग्रस्त रुग्णांना मुंबई जाण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, याबाबत रोशन लाल यांनी बल्लारपूर रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना निवेदन देत तात्काळ सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी केली, जर सुरू करण्यास विलंब झाला तर उर्वरित रेल्वे वाहतूक बंद करण्यात येणार असा इशारा रोशनलाल यांनी दिला आहे.
यावेळी सचिन जाधव, शफाक शेख, शैलेश लांजेवार, याकूब पठाण, उमेश बर्डे, बुधराज चांदेकर, शिल्पा व सचिन देशमुख यांची उपस्थिती होती.
