News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या नफ्यामधून केवळ शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी शेतकरी व त्यांचे कुटुंबीय यांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना हिम्मत देणे हेच CDCC बँकेचे कर्तव्य समजून बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मुल येथील शेतकरी परशुराम कावळे यांचा मुलगा चैतन्य कावळे हा अनेक दिवसांपासून दुर्धर गँभीर आजाराने त्रस्त आहे. त्याला आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन CDCC बँकेच्या chandrapur शेतकरी कल्याण निधीमधून मदतीचा चैतन्य कावळे या रुग्णाला उपचारासाठी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते २० हजार रुपयांचा चेक देण्यात आला.याप्रसंगी तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर, मुल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, संचालक शांताराम कामडे,नगर सेवक विनोद कामडे, रुग्णाचे आजोबा गजानन कावळे (महाराज) सामाजिक कार्यकर्ते गुरु गुरनुले, चंदू कावळे, पुरुषोत्तम गुरनुले यांचेसह युवक कांग्रेस कार्यकर्ते, वार्डातील नागरिक उपस्थित होते. मदतीची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक असल्याचे बोलले जात असले तरी बँकेचे अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी बँकेचे सूत्रं हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक बदल केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेणारी एकमेव बँक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या बँकेला मिळालेल्या आर्थिक नफ्यातून धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कँसर व अन्य दुर्धर आजार झाल्याने शेतकरी खचतो म्हणून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत देऊन रुग्णाला व त्यांच्या कुटुंबीयांना पुनर्जीवित करण्याचे पुण्य कार्य करीत असल्याने शेतकरी व कुटुंबियांनी संतोषसिंह रावत व बँकेचे समस्त संचालक मंडळ यांचे कावळे कुटुंबीयांनी व वॉर्ड वासीयांनी आभार मानले आहे. Financial help
