News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात दरवर्षीच सर्वाधिक वाघाने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. तालुक्यातील असंख्य नागरिकांची शेत बहुतांश जंगलाला लागूनच असल्याने आणि शेतकरी बांधवाना कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शेती केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेती करणे भाग पडत आहे. Wild animal
शेती परिसरात वाघांचा व अन्य वन्यप्राण्यांचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या दोन दिवसात त्या परिसरात वाघाने तिघांचा बळी घेतला ज्यामध्ये एका १६ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटना अतिशय दुर्देवी आहे. दुसऱ्या दिवशी ऊर्जानगर परिसरात पट्टेदार वाघाने कामगारांवर हल्ला करुन ठार केले. लगेच तिसऱ्या दिवशी कोसंबी येथील स्वतःच्या शेतात लाख खोदण्याचे काम करीत असतांना ५५ वर्षीय सौ.ज्ञानेश्वरी मोहूर्ले या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. मागील वर्षी सुद्धा याच भागात मारोडा येथील एका व्यक्तीवर झडप घेऊन ठार केल्याची घटना जुनी झालेली नाही. तसेच कोसंबी परिसररातीलच उमा नदीच्या पलीकडे मोरवाही येथील शेतात लाखोरीच जमा करीत असतांना पाल नावाच्या दोन लहान मुलांच्या आईवर वाघाने हल्ला करून ठार केले आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला मुल जवळच लागून असलेल्या मौजा चिंचोली येथील व्यक्तीला ठार केल्याची घटना ताजी आहे. तसेच मौजा टेकडी येथील एका शेतकऱ्यावर वार करून ठार केल्याची घटना आजूनही चर्चेत आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देखील मिळायची असल्याचे समजले. मागील दोन वर्षांपूर्वी मुल तालुक्यातीलच मौजा कवडवपेठ येथील शेतातच शेतकऱ्याला ठार केले आहे. मागील वर्षी म्हणजे २०२०-२१ मधेच कांतापेठ येथील महीला वाघाच्या हल्ल्यात दगावली आणि मौजा जानाला येथे गुरे राखण करणाऱ्या गुराख्यावर झुडुपात दबा धरून बसलेल्या tiger attack वाघाने हल्ला करुन ठार केले आहे. यामध्ये काही घटना आठवणीतून सुटल्या असतील तरी सुद्धा मुल तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्याचे बैल, गाई, म्हशी ठार केल्याच्या घटना वन विभागाकडे फाइल झाल्या आहेत. एकंदरीत मुल तालुक्यात वाघामुळे मानवही सुरक्षित नाही आणि शेतकऱ्यांचे जनावरेही सुरक्षित नाही ही वस्तुस्थिती शासन आणि वन अधिकारीही नाकारु शकत नाही. अशा परिस्थितीत केंद्र असो वा राज्य शासनाच्या वतीने आणि वन अधिकारी यांनी याबाबतची गंभीर दखल अजूनही घेतल्याचे दिसून येत नाही. जर शासनाने गँभीर दखल घेतली नाही तर दर वर्षाला मानवावर व शेतकऱ्यांच्या जनावरांवर याहूनही अधिकच्या घटना घडतच राहतील यात शंका नाही. करीता शासनाने आणि वन अधिकारी यांनी ज्या जंगल शिवारात वाघाचे व वन्यप्राणी यांचे वावर आहे त्या जंगलाच्या सभोवताल संरक्षित भिंत उभारावे किंवा शासनाच्या व वन अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून वाघाचा बंदोबस्त होईल अशी उपाय योजना करावी व मानवाला आणि जनावरांना जिवंत ठेवावे अशी मागणी मुल नगर परिषदेचे माजी नगर सेवक मोती टहलीयांनी यांनी हल्ला होत असलेल्या जनतेकडून व शेतकरी बांधवांच्या वतीने केली आहे.
