News34 Chandrapur
चंद्रपूर - : सीतारामपेठ, कोडेगाव, मुधोली परिसरातील नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करून तिला जेरबंद करण्याच्या सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वनाधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत नरखेडकर, निवासी जिल्हाधिकारी मेश्राम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी, रामगावकर, गुरुप्रसाद यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. Cannibal tiger
वडाला ते मुधोली, मुधोली ते खुटवडा, मुधोली ते भामडेली या मुख्य रस्त्यावर वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो परंतु या रस्त्यावर दोन्ही बाजूला दाट झाडे झुडपे निर्माण झाली आहे. त्यामुळे अचानक जंगलातून वन्यप्राणी रोडवर निघतात. तेव्हा दुचाकी धारक, सायकलस्वार व चारचाकी वाहनधारकांची तारांबळ उडून अनेकदा accident घडतात. या भागात या वाघिणीचे हल्ले वाढले आहे. Wildlife
काही दिवसांपूर्वी या भागामध्ये या वाघिणीच्या हल्ल्यात ग्रामस्थांला जीव गमवावा लागला. या वाघिणीचे वावर या भागात असल्यामुळे येथील ग्रामस्थ या भागामध्ये जाण्यासाठी देखील घाबरत आहेत. त्यासोबतच भीतीपोटी एका व्यक्तीने आपली जनावरे देखील विकून बेरोजगार झाला आहे. हि बाब अतिशय गंभीर असून या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा प्रस्ताव तात्काळ मंत्र्यालयात पाठवण्याच्या सूचना यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वनाधिकाऱ्यांना केल्या. उद्या या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी स्वतः आमदार व वरिष्ठ वनाधिकारी जाणार आहे.
