चंद्रपूर - आकर्षक व्याज देण्याच्या नावाखाली चंद्रपुरातील अनेकांची Fraud करणारा पंकज फुलझेले स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला असून त्याला पालघर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
2015 ला चंद्रपुरात ओरिएन्ट ओझस बायोटेक व वर्कदंत सोसायटी नावाची कम्पनी स्थापन करून त्यामध्ये अनेक एजंट नियुक्त केले.
एजंटना त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून सदर कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले होते, त्या कंपनीत अनेक नागरिकांना आकर्षक व्याजाचे प्रलोभन देण्यात आले.
आकर्षक व्याजाला बळी पडून अनेक सेवानिवृत्त नागरिकांनी मोठी रक्कम त्या कंपनीत गुंतवली. एकूण 2 कोटी रुपयांची Investment त्या कंपनीत झाली, आधी नागरिकांना काही प्रमाणात व्याज मिळाले मात्र काही दिवसांनी ते Interest नागरिकांना मिळणे बंद झाले.
नागरिकांनी याबाबत 2019 ला पंकज फुलझेले विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. Chandrapur news
गुन्हा दाखल होताच फुलझेले आपल्या कुटुंबासाहित फरार झाला होता, काही दिवसांपूर्वी पीडित नागरिकांनी याबाबत press परिषद घेत पोलिसांवर कारवाई न करण्याचा आरोप लावला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या प्रकरणाची दखल घेत सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे सोपविला. Chandrapur police
खाडे यांनी याबाबत आधी तांत्रिक तपास करीत आरोपी फुलझेले यांच्या लोकेशन ची माहिती घेतली फुलझेले हे पालघर जिल्ह्यातील लक्ष्मी लॉज येथे लपून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनी अतुल कावळे, अभय मूर्तरकर, अनुप डांगे, जमिल पठाण, मिलिंद चव्हाण यांनी केली.
