News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल नगर विकासाचा डंका वाजत असला तरी देखील नगरातील अनेक वार्डात अजूनही समस्या प्रलंबित रेंगाळत आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. म्हणून कांग्रेसतर्फे वॉर्ड निहाय समस्या जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतला असून कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती Cdcc bank president बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली मुल येथील वार्ड नंबर -१ मधील बचत गटातील महिलांशी प्रत्यक्ष चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. Congress
महिलांकडून समस्या समजून घेताना संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आणि माजी नगर परिषद उपाध्यक्ष राकेश रत्नावार, महाराष्ट्र राज्य स्तरीय ओबीसी कांग्रेस सेलचे प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, मुल शहर कांग्रेसचे अध्यक्ष सुनील शेरकी,उपाध्यक्ष सुरेश फुलझेले, महिला कांग्रेसच्या अध्यक्षा रुपाली संतोषवार, जेष्ठ महिला कांग्रेस पदाधिकारी विमलताई धारने, संगीता भोयर,कृष्णा सुरमवार, नितेश मॅकलवार यांचेसह कांग्रेस युवक कार्यकर्ते उपस्थित होते. मूल नगरातील आमच्याच नाही तर अनेक वार्डात महत्वपूर्ण समस्या आजही प्रलंबित आहेत. नगर परिषद पदाधिकारी यांचा कालावधी पूर्ण झाला तरी रस्ते व नाल्या झालेल्या नाही. नालीतील कचरा लगेच फेकल्या जात नाही, अजूनही वार्डात गावठी डुकरे हैदोस माजवीतांना दिसत आहेत. काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. Chandrapur news
आजही काही नागरिकांना भरपूर पिण्याचे पाणी नळाला येते तर काहींना पूर्ण पाणीही मिळत नाही. नाल्यामध्ये फवारणी होत नसल्याने आरोग्याच्याही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्याही भावना महिलांनी बोलून दाखविल्या.
