प्रतिनिधी/गुरू गुरनुले
News34 mul
मुल तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका शिवसेना कार्यालयात नगर परिषद, जि.प. व पं.स. election निवडणुकीमध्ये यश संपादन करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते.
या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मुख्य उपस्थितीत मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते. या आढावा बैठकीचे संचालन युवासेना तालुकाप्रमुख संदिप सुरेश निकुरे यांनी केले. या बैठकीला चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांचे स्वागत शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले तसेच चांदापुर ग्रामपंचायत येथे उपतालुकाप्रमुख रवि शेरकी यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Shivsena
या आढावा बैठकीचा मुख्य उद्देश आगामी निवडणुकीची तयारी तथा पदसंघटन वाढवीने तसेच मुल तालुक्यातील प्रथमच मागील निवडणुकीत यश मिळवुन दोन सरपंच व तिन उपसरपंच तसेच एकुन 26 सदस्य निवडुन आणुन मुल तालुक्यात प्रथमच यश संपादन केले त्यासारखे आगामी निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. मागील कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या अतिशय संयमी पध्दतीने परीस्थिती हाताळली तसेच शासकीय योजनांचा आराखडा सर्व तालुक्यातील जनमानसाच्या मनात रूजवा व पक्षसंघटन वाढवुन गाव येथे शाखा घर तेथे शिवसैनिक असे बिदवाक्य घेऊन संघटन वाढवावे असे आवाहन मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले या आढावा बैठकीला जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांनी संबोधित करताना मुल तालुक्यातील सर्व नगर परिषद,जि.प,पंचायत समिती क्षेत्रामधील उमेदवाराची चाचणी घेऊन पंचायत समिती गण तसेच नगर परिषद प्रभाग बैठकीचे आयोजन करण्याचे आवाहन केले तसे न केल्यास पदाधिकारी यांची गय केली जाणार नाही असे संबोधन करित असताना सांगीतले.तसेच या आढावा बैठकीला उपस्थित उपतालुकाप्रमुख रवि शेरकी, सत्यनारायण अमरूदिवार शहर प्रमुख राहुल महाजनवार,शहर समन्वयक अरविंद करपे,युवा सेना तालुकाप्रमुख संदिप निकुरे, महीला आघाडी तालुकाप्रमुख रजनी झाडे, यूवा सेना सरचिटणीस विनोद काळबांधे तथा अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थीत होते.