चिमूर - तालुक्यातील गदगाव येथील 4 वर्षाच्या मुलीवर चॉकलेट व केक देण्याचे आमिष देत लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
आरोपी 21 वर्षीय निखिल रमेश पिंपळकर याने संधी साधत चिमुकलीला चॉकलेट व केक देण्याचे आमिष दाखवीत तिच्यावर अत्याचार केला.
मुलीचे आई-वडील घरी आल्यावर सदर प्रकार त्यांना समजला असता याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली, पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवीत आरोपी निखिल पिंपळकर ला अटक केली. Poccso
सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन चिमुर येथे प्राप्त तक्रारीवरुन अपराध क्रमांक ६७ /२०२२ कलम ३७६ (१), ३७६ (AB) भारतीय दंड संहिता तसेच कलम ४ लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम सन २०१2 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन संजय सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक दंडवते या गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.