News34 Chandrapur
चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील 27 वर्षीय आशिष गजभिये या युवकाने गावातील घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केल्याची घटना घडली, पोलिसात तक्रार दिल्यावर आरोपी गजभिये हा पसार झाला, मात्र पोलीस आरोपीला पकडण्यास अपयशी ठरत असून मला न्याय द्या अशी मागणी पीडितेने पत्रकार परिषदेत केली.IPC 376
खडसंगी गावातील खाजगी बँक चालविणारा 27 वर्षीय आशिष दिलीप गजभिये हा वर्ष 2017 पासून पीडितेशी ओळखी करत घरी यायचा, काही दिवसांनी आशिष ने पीडितेसोबत लग्न करतो अशी गळ घातली.
पीडितेचा वर्ष 2009 मध्ये घटस्फोट झाला होता, पीडितेला एक मुलगी आहे. Rape
पीडितेला आशिष ने लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, मागील 5 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवीत पीडितेचा अत्याचार आशिष गजभिये यांनी केला, लग्नाचे आमिष दाखविले पीडितेला आणि आशिष ने लग्न केले दुसऱ्या मुलीसोबत, आरोपीला तात्काळ अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी पीडितेने पत्रकार परिषदेत केली आहे.